Follow us

Home » राज्य » शिक्षण » यशोदा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये व्हीएलएसआय सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना

यशोदा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये व्हीएलएसआय सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना

यशोदा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये व्हीएलएसआय सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना

सेमीकंडक्टर संदर्भात महत्त्वपूर्ण उपक्रम, यशोदा इन्स्टिट्यूटस आणि सायनटेक यांच्यामध्ये करार

बदलत्या जगाच्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार गरजेचे असणारे प्रात्यक्षिक आधारित शिक्षण देण्याचे उद्देशाने यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये व्हीएलएसआय सेंटर ऑफ एक्सलन्स ची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्स मधून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानद्वारे शिक्षण देता येणार आहे. तशा प्रकारचा सामंजस्य करार यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि नामांकित सायनटेक या कंपनीमध्ये नुकताच करण्यात आला. यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये आयोजित विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम नंतर सदरच्या सामांजस्य करारावरती उभयंताकडून स्वाक्षरी करण्यात आली.

 

सदरचा सामंजसकारात हा शिक्षकांना ट्रेनिंग देणे विद्यार्थ्यांना विकासात्मक कार्यशाळा आयोजित करणे, इंडस्ट्रियल व्हिजिटचे आयोजन करणे यासोबतच यशोदा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व बाबी करण्याचे आश्वासन यावेळी सायनटेक कंपनीकडून देण्यात आले.

 

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये सर्वच विभागात अद्ययावत प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी असणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाने भरपूर असणाऱ्या उपकरणांमुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीज स्पेसिफिक ट्रेनिंग घेता येतात. आणि कार्पोरेट क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वच प्रकारच्या जॉब प्रोफाइल साठी स्वतःची तयारी करता येते. व्हीएलएसआय सेंटर ऑफ एक्सलन्स अनेक कारणांसाठी, विशेषतः शिक्षण, संशोधन आणि सेमीकंडक्टर उद्योगाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सेमीकंडक्टर संदर्भात महत्त्वपूर्ण उपक्रम

दर्जेदार शिक्षणामध्ये प्रयोगशाळांचे महत्त्व अनन्यसाधारण असते, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या, सर्व प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यावर आपण भर देणार असल्याचे यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीरा देवघर प्रकल्पातून शेती सिंचनाचे तंतोतंत नियोजन :आमदार मकरंद पाटील यांचा पुढाकार 

नीरा देवघर प्रकल्पातून शेती सिंचनाचे तंतोतंत नियोजन आमदार मकरंद पाटील यांचा पुढाकार  खंडाळा तालुक्याचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली  खंडाळा : खंडाळा

Live Cricket