उत्कर्ष पतसंस्थेच्या गिर्यारोहण स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
8 मार्च महिला दिना निमित्त यावर्षी खास महिलांसाठी गिर्यारोहणाच्या स्पर्धेचे आयोजन उत्कर्ष पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण सातारा जिल्ह्यातून तब्बल 149 महिलांनी सहभाग नोंदवला होता. सकाळी ठीक 6 वाजता सोनजाई डोंगराच्या पायथ्याशी या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आंतर राष्ट्रीय गिर्यारोहक माननीय श्रीमती उषाताई पागे व आशिष माने यांनी त्यांच्या गिर्यारोहणाचे अनुभव या प्रसंगी सांगितले, व हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवा असे देखील मत व्यक्त केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी डोंगर संपूर्ण चढला व स्पर्धा पूर्ण केली त्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी सर्वांचेच विशेष कौतुक केले. या स्पर्धेत 21 ते 30 वयोगटात शैला जायगुडे – प्रथम, पूजा पवार – द्वितीय, व गौरी गोफने – तृतीय, 31 ते 40 वयोगटात उज्वला शिंदे – प्रथम, रोहिणी जाधव- द्वितीय, व वनिता इरणक – तृतीय, गट क्रमांक 41 ते 50 मीना मगर – प्रथम, अनिता गोरे – द्वितीय, व प्रतिमा सुतार – तृतीय
गट क्र 4 51 ते 60 डॉ लता पाटील- प्रथम, मनीषा कुंभार – द्वितीय, व पौर्णिमा चव्हाण- तृतीय गट क्र 5 वय वर्षे 60 ते पुढे खुला यामध्ये डॉ नीलम भोसले – प्रथम, रोहिणी निकम – द्वितीय जयश्री सोहनी – तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना उत्कर्ष पतसंस्थेच्या वतीने आकर्षक भेटवस्तू, सन्मानचिन्ह व मृणालिनी कोळेकर यांच्या वतीने फूट मसाज पासेस देण्यात आले. महिलांसाठी अनेक संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम होतच असतात पण उत्कर्ष पसंस्थेने यावर्षी घेतलेल्या या हटके कार्यक्रमाबद्दल सहभागी स्पर्धकांनी विशेष आभार व्यक्त केले. गिर्यारोहणाच्या या स्पर्धेला वाईतील सामाजिक कार्यकर्ते श्री रणवीर गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेला संचालक श्री अमर कोल्हापुरे, श्री वैभव फुले, श्री संजय वाईकर, श्री भूषण तारू, डॉ मंगला अहिवळे, श्रीमती निला कुलकर्णी, संस्थेचे सर्व कर्मचारी व सौ प्रीती कोल्हापुरे, डॉ पोळ, डॉ गजेंद्र पाटील उपस्थित होते.
