कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पांचगणी नगरपरिषद व हिलदारीच्या पर्यावरण उपक्रमाला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पांचगणी नगरपरिषद व हिलदारीच्या पर्यावरण उपक्रमाला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पांचगणी नगरपरिषद व हिलदारीच्या पर्यावरण उपक्रमाला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचगणी प्रतिनिधी -पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेला शहरातील शाळांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाचगणीतील विविध शाळांमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाबद्दलची आपली संवेदनशीलता आणि जबाबदारी स्पष्टपणे व्यक्त केली.

स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्वत संरक्षण, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ–हिरवे हिल स्टेशन घडविण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी या विषयांवर अभिनव कल्पना, आकर्षक रंगसंगती आणि प्रभावी संदेशांचा वापर करून देखणे आणि अर्थपूर्ण पोस्टर्स तयार केली.

कचरा वर्गीकरण, पर्वतांवरील वाढते प्रदूषण, जबाबदार पर्यटन, स्वच्छ पंचगणी आणि हरित पर्यावरण यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांची मांडणी विशेषत्वाने लक्षवेधक ठरली.

कार्यक्रमादरम्यान हिलदारी टीमने सांगितले की, “विद्यार्थ्यांचा या प्रमाणात उत्साह पाहून आनंद होत आहे. पुढील पिढी पर्यावरणाबाबत अधिक जागरूक आणि पुढाकार घेणारी असल्याचे या स्पर्धेतून स्पष्ट जाणवते.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात येत असून विजेत्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

पांचगणी नगरपरिषदेकडून, “स्वच्छ, जबाबदार आणि पर्यावरणपूरक हिल स्टेशन घडविण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातील,” असे मत व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमात योगदान दिल्याबद्दल एस. एम. बाथा हायस्कूल, गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, बेल एअर नर्सिंग कॉलेज, ग्रीन व्हॅली स्कूल, नगरपरिषद शाळा क्र. १ व २, पाइनवूड्स इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, विस्डम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, रीड अँड रायझ इन्स्टिट्यूट, विद्या निकेतन हायस्कूल, महात्मा फुले विद्या मंदिर, स्वीट मेमरीज हायस्कूल, किमिन्स हायस्कूल, बिलीमोरिया हायस्कूल, किड्स नेस्ट प्री-प्रायमरी स्कूल, हॅपी अवर्स हायस्कूल, शालोम इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, संजीवन विद्यालय आदी सर्व शैक्षणिक संस्थांचे आयोजकांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

भावी काळातही शाळांनी अशा पर्यावरणपूरक उपक्रमांत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.सदर उपक्रमात पांचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले असून सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हिलदारी टीम ने परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket