सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने पूर्व ग्रंथ महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्साह
सातारा (प्रतिनिधी):सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती आयोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्व ग्रंथ महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरी, जिल्हा परिषद मैदान येथे रविवारी (दि. ९ नोव्हेंबर २०२५) सकाळी साडेआठ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम रंगला.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, मुख्य समन्वयक आर. पी. निकम, संतोष लाड, समन्वयक सुनीता कदम व प्राचार्य प्रमोदिनी मंडपे उपस्थित होते. संवादक म्हणून संतोष लाड यांनी कार्यक्रमाचे सुंदर संचालन केले.
या वेळी बोलताना मुख्य समन्वयक आर. पी. निकम म्हणाले, “विद्यार्थी वर्षभर आपली कलाकौशल्ये विकसित करतात. या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळते, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गेली २५ वर्षे शिक्षण विभागाच्या सहकार्याने आम्ही हा ग्रंथ महोत्सव सातत्याने साजरा करत आहोत.”
कार्यवाह शिरीष चिटणीस म्हणाले, “या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मिळणारा अनुभव त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. या कार्यक्रमातील क्षण विद्यार्थ्यांच्या आठवणीत कायम संस्मरणीय राहतील.”
कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देखण्या नृत्य, गीत व सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली.
प्राथमिक विभागातील सादरीकरणे:
आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर – *गोंधळी नृत्य*
लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर, मोळाचा ओढा शाहूपुरी – *शिवकन्या*
नवीन मराठी शाळा – *घागर नृत्य – ऐरणीच्या देवा*
लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर, एमआयडीसी कोडोली – *फुलवंती*
गोकुळ प्राथमिक शाळा – *वारकरी ज्ञानेश्वर मुक्ताई गीत
जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल – *शिवबा राजे*
माध्यमिक विभागातील सादरीकरणे:**
लोकमंगल हायस्कूल, मोळाचा ओढा – *लल्लाटी भंडार
लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी कुशी – *विठ्ठल विठ्ठल
अनंत इंग्लिश स्कूल – जोगवा
लोकमंगल हायस्कूल, एमआयडीसी कोडोली – ऑपरेशन सिंदूर
भवानी विद्यामंदिर – आले मराठे
सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल – हिंदी भाषा राष्ट्रभाषा*
कन्या विद्यामंदिर, करंजे पेठ – मंगळागौर
साधना इंग्लिश मीडियम स्कूल – जोगवा
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण प्रेक्षागृह दाद देत दुमदुमले. या कार्यक्रमाने साहित्य, संस्कृती व शिक्षण यांचे सुंदर संगम साधत ग्रंथ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी एक आनंददायी वातावरण निर्माण केले.




