महाबळेश्वर तालुक्यातील दांनवली गावचे सुपुत्र युवा नेतृत्व गणेश बंडू दानवले यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड करून शरद पवार गटाने महाबळेश्वर तालुक्यात शरद पवारांच्या विचारांची युवा तरुणांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये शरद पवार साहेबांना मानणारा प्रचंड प्रमाणात युवा वर्ग असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच शरद पवार गटास तरुणांची साथ मिळणार आहे.
लोणंद येथे झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात दानवली गावचे सुपुत्र गणेश बंडू दानवले यांना सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रसचे सरचिटणीस म्हणून नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मा.शरद पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल महाबळेश्वर तालुक्यात शरद पवार समर्थकांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले आहे.
यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयंत पाटील, विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा अध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील व राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते आणि महाबळेश्वर तालुक्यातील युवक तसेच दानवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश दानवले यांच्या निवडीबद्दल त्यांचे सामाजिक राजकीय स्तरातून अभिनंदन होत आहे.
