Home » ठळक बातम्या » आरोग्य » एका दिवसात तब्बल २२७४ आयुष्मान कार्ड वाई पंचायत समितीची नियोजनबद्ध मोहीम ठरली यशस्वी

एका दिवसात तब्बल २२७४ आयुष्मान कार्ड वाई पंचायत समितीची नियोजनबद्ध मोहीम ठरली यशस्वी

एका दिवसात तब्बल २२७४ आयुष्मान कार्ड वाई पंचायत समितीची नियोजनबद्ध मोहीम ठरली यशस्वी

वाई – (प्रतिनिधी)आरोग्य सुरक्षा हमी देणाऱ्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – आयुष्मान भारत या उपक्रमांतर्गत वाई तालुक्यात बुधवार, दि. १० सप्टेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २,२७४ लाभार्थ्यांची आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली.आयुष्यमान कार्ड हे सामान्य नागरिकांसाठी आरोग्य कवच ठरते. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्डे काढून तालुक्यातील नागरिकांना थेट आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळणार आहे, ही बाब समाधानकारक आहे.या यशस्वी उपक्रमाची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी दिली.

वाई पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपासून गावोगावी जाऊन आयुष्यमान कार्डची माहिती दिली होती. त्याचाच परिणाम म्हणून नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या मोहिमेत आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ऑपरेटर आणि ग्रामपंचायत विभागातील सर्व कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून ही मोहीम यशस्वी केली असल्याचे गटविकास अधिकारी परिट यांनी सर्व सहभागींचे कौतुक केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 87 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket