प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार
पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात शांततेत व व्यवस्थितरित्या पार पडली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासन, निवडणूक विभाग व पोलीस यंत्रणेमध्ये उत्तम समन्वय दिसून आला.
निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत सुबराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पंडित खंडू पाटील यांच्या सहकार्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदान केंद्रांवरील व्यवस्था, मतमोजणीची तयारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न याबाबत योग्य नियोजन करण्यात आले होते.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक, पाचगणी मा. दिलीप पवार व त्यांच्या पथकाने प्रभावी बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.एकूणच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या काटेकोर नियोजनामुळे पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ यशस्वी, शांततापूर्ण आणि लोकशाही मूल्यांना साजेशी ठरली.



