Home » ठळक बातम्या » शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल ,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व आदर्श विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याची मदत मा. शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे साहेब माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जमा करण्यात आली.

शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव तुषार पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना समाजाप्रती असणारी त्यांची नैतिक जबाबदारी समजावी व मदतीची भावना वृद्धिंगत व्हावी या हेतूने तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीही पेन्सिल बॉक्स, खोड रबर बॉक्स, पेनांचे बॉक्स, वह्या, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य असे शालोपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात जमा केले तसेच काही पालकांनीही उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांसाठी शालेय पोशाख ही आणून दिले व या सर्व साहित्यांची मदत सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्षा सौ वत्सलाताई डुबल, उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप ,जगन्नाथ किर्दत, सचिव तुषार पाटील ,चेअरपर्सन सौ.प्रतिभा चव्हाण श्रीपतराव पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ नीलम शिंदे, आदर्श विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ नूतन जाधव, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड व तीनही शाखांमधील शिक्षक उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 34 शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील

Live Cricket