Home » देश » बाजार समितीच्या भव्य व्यापारी संकुलामुळे भाऊसाहेब महाराजांची स्वप्नपूर्ती ना.शिवेंद्रसिंहराजे

बाजार समितीच्या भव्य व्यापारी संकुलामुळे भाऊसाहेब महाराजांची स्वप्नपूर्ती ना.शिवेंद्रसिंहराजे

बाजार समितीच्या भव्य व्यापारी संकुलामुळे भाऊसाहेब महाराजांची स्वप्नपूर्ती ना.शिवेंद्रसिंहराजे

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नत्तीसह तालुक्याच्या अर्थकारणाला गती 

सातारा- सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती खिंडवाडी येथील जागेत भव्य ‘स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल उप बाजार’ या भव्य व्यापारी संकुलाची उभारणी करत आहे. या व्यापारी संकुलामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार असून शेतमाल मोठमोठ्या शहरांमध्ये पाठवणे सोयीचे होणार आहे. या संकुलामुळे स्व. भाऊसाहेब महाराज यांची स्वप्नपूर्ती होत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नत्तीसह सातारा तालुक्याच्या अर्थकारणाला अधिक गती मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

 सातारा शहरात बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील उपलब्ध असलेली जागा शेतक-यांना सुविधा उमलब्ध करण्याकरीता अपुरी पडत असल्यामुळे बाजार समितीच्या संभाजीनगर- खिंडवाडी येथील जागेत ‘स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल उप बाजार’ या भव्य व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. या भव्यदिव्य संकुलाच्या इमारतीच्या प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार, माजी चेअरमन लालासाहेब पवार, सतीश चव्हाण, ज्येष्ठ संचालक किरण साबळे पाटील, नामदेव सावंत, माजी संचालक सुनीलशेठ झंवर, व्यापारी राधेश्याम भंडारी, चंदूकाका शहा, कांतीलाल जैन, पप्पू शेठ, आबा धनवडे, संतोष चौधरी, अरविंद चव्हाण, उत्तमराव नावडकर, शशिकांत जाधव यांच्यासह सर्व संचालक व सातारा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        या संकुलामध्ये भाजीपाला मार्केटसाठी ४० गाळे, फळे मार्केटसाठी २४ गाळे, कांदा-बटाटा मार्केट २४ गाळे, भूसार मार्केट ५८ गाळे असणार आहेत. याशिवाय सुसज्ज कोल्ड स्टोअरेज, प्रशस्त बाजार समिती कार्यालय व सभागृह, व्यावसायिक गाळे, पशु वैद्यकिय दवाखाना, हॉटेल व रेस्टॉरंट, हमाल माथाडी भवन, शेतकरी निवास व्यवस्था, पाणी व्यवस्थापनासाठी पाणी साठवण टाकी, पुरूष व महिला स्वच्छता गृह, वाहनतळ आदी परिपूर्ण सोयीसुविधा असणार आहेत. शहरातील कमी जागेमध्ये शेतकरी, व्यापारी यांच्यासह ग्राहकांची कुचंबणा होत होती. सातारा बाजार समितीचे सुसज्ज मार्केट असावे, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना सर्व प्रकारच्या सुविधा तिथे उपलब्ध असाव्यात अशी इच्छा स्व. भाऊसाहेब महाराजांची होती. आज त्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होत आहे. महाराष्ट्रातील एक भव्यदिव्य, सर्व सोयींनी युक्त सुसज्ज उप बाजार संकुल उभे राहत असून त्याचा फायदा आपले शेतकरी, बाजार समितीशी निगडित व्यापारी आणि ग्राहकांना होईल, आणि सातारा तालुक्याच्या अर्थकारणीय विकासामध्ये वाढ होईल, असे ना. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 333 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket