Home » राज्य » शिक्षण » औषध निर्माण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे -श्रीरंग काटेकर

औषध निर्माण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे -श्रीरंग काटेकर 

औषध निर्माण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे -श्रीरंग काटेकर 

गौरीशंकर डी फार्मसी लिंब येथे राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन, राज्यभरातील 60 स्पर्धकांचा सहभाग

लिंब – औषध निर्माण शास्त्र शाखेत काळानुसार बदल घडत आहेत विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार नाविन्यपूर्ण शिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे त्यासाठी विविध स्तरावर होणाऱ्या स्पर्धात्मक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले ज्ञान परिपूर्ण करावे असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता.जि. सातारा येथील गौरीशंकर डी फार्मसी लिंब महाविद्यालयात आयोजित केलेल्या एक दिवशीय राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय राजे,प्रा. सविता मोरे,प्रा. सारिका लोखंडे,प्रा. स्वाती पवार,प्रा. उज्वला बाल्टे,प्रा.शिवानी पोळ ,प्रा.रणजीत थवरे, तसेच ए जी पाटील पॉलिटेक्निक सोलापूर कॉलेजचे प्रा.सुमित लिंगाडे ,प्रा.तैशिफ पाटील पेपर प्रेझेंटेशन चे निरीक्षक प्रा. दुधेश्वर क्षिरसागर ,प्रा.शुभम चव्हाण अदि प्रमुख उपस्थित होते.

 श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की मानवी आरोग्याशी निगडित असणारे औषध निर्माण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उज्वल करिअरची संधी असून यामधील उच्च शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे .

प्राचार्य विजयराजे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या नविण्यपूर्ण कल्पना शक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ हेतू ठेवून राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन आयोजन केले आहे .

विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपल्या ज्ञान कौशल्याची चुणूक दाखवावी या स्पर्धेत सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर येथील विविध महाविद्यालयातील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवानी पोळ व आभार प्रा.सविता मोरे यांनी मानले .

  विद्यार्थ्यांनी केवळ केमिस्ट व्यवसायाची उद्दिष्टे डोळ्यासमोर न ठेवता डी फार्मसी पदवीनंतर या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास घेऊन वाटचाल केली पाहिजे औषध निर्माण क्षेत्रात जागतिक स्तरावरील बदल पाहता या क्षेत्रातील सखोल ज्ञान घेणारे विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल राहणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु-रुपाली चाकणकर

Post Views: 127 महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु-रुपाली चाकणकर सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची

Live Cricket