केवळ आश्वासने देणार नाही तर कामे पूर्ण करुन दाखवणारच : सौ. हेमलता भोसले
सातारा –सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर त्यात आलेल्या शाहूनगर परिसरातील प्रभाग क्रं.१९ मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून सौ. हेमलता सागर भोसले, सुशांत महाजन हे नगरसेवकपदासाठी रिंगणात आहेत. अनेक वर्षांपासून आपण या परिसरात राहत आहे. तुमच्या, माझ्या, सर्वांच्या समस्या एकच आहेत. त्यातील काही समस्यांची सोडवणूक गेल्या काही वर्षात विविध उपक्रम राबवून तुमच्या साथीने काही प्रमाणात सोडवल्या आहेत. आता या निवडणुकीत केवळ आश्वासन देण्यासाठी नाही तर ती आश्वासने, कामे पूर्ण करुन दाखवण्यासाठी मी रिंगणात असून मतदारांनी मला पाठिंबा द्यावा असे आवाहनही सौ. हेमलता भोसले यांनी केले.
प्रभाग क्रं.१९ मध्ये सौ. हेमलता भोसले यांनी मतदारांच्या गाठीभेटी, पदयात्रा, कॉलनीत बैठका, कोपरा सभा यावर भर देत जोरदार प्रचार सुरु केला असून युवा,युवती, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांशी संवाद साधताना सौ. हेमलता भोसले म्हणाल्या, या भागाचा विकास होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे होते. समाजकार्य पूर्ण करण्यासाठी राजकारणात येणे गरजेेचे होते, त्यात यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मला साथ द्यावी. तुमच्या, माझ्या सर्वांच्या सगळ्यांच्या समस्या एकच आहेत, त्या तुमच्या साथीने मला सोडवायच्या आहेत. या परिसरात आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले त्याला महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिकांनी चांगली साथ दिली. मी निवडणुकीत केवळ आश्वासने देण्यासाठी ती पूर्ण करुन दाखवण्यासाठी मतदारांनी मला साथ द्यावी असे आवाहन केले. यावेळी बोलताना युवा उद्योजक सागर भोसले यांनी आपण सगळ्यांनी याठिकाणी प्रत्येक सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष केला आहे. आता खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तुमचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सौ.हेमलता भोसले, सुशांत महाजन आणि नगराध्यक्षपदासाठी अमोल मोहिते यांना संधी दिली असून त्यांना भरघोस बहुमताने निवडून द्या असे आवाहन केले. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवती, विविध मंडळाचे कार्यकर्ते आणि मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.




