Post Views: 77
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादले 100 टक्के टॅरिफ 1 नोव्हेंबरपासून चीनवर 100% कर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादले 100 टक्के टॅरिफ लादले आहे. ट्रम्प यांच्याकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत नवीन कर जाहीर करण्यात आले आहे.अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील तणाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
1 नोव्हेंबर 2025 पासून चिनी वस्तूंवर 100 टक्के आयातशूल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा त्यांनी केली आहे.अमेरिकेत निर्माण केलेल्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवरही कठोर नियंत्रणे आणण्याची योजना त्यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला लक्ष्य केल्याचे तसेच अमेरिका-चीन व्यापार युद्ध पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
