श्रीकांत देशमुख लिखित दोन शब्द दोन गोष्टी काव्यसंग्रहाचे द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
सातारा येथील नामांकित कवी,लेखक श्रीकांत देशमुख यांच्या स्वरचित दोन शब्द दोन गोष्टी या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन डॉ. जयश्री शिंदे, प्रा. डॉक्टर चंद्रकांत नलावडे, प्रा डॉ. श्यामला माने, प्राध्यापक शालिनी जगताप, डॉ. शिरीष भोईटे सतीश कदम व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
वाचन संस्कृती जोपासण्याबरोबरच, सभोवताली असणाऱ्या विविध घटनांचा वेध घेऊन काव्य निर्मिती तयार झाल्याने वाचकांची उत्कंठा खिळून राहते. यां प्रसंगी सातारा हॉस्पिटल अँड डायनोस्टिक सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुरेश शिंदे, सीईओ विक्रम शिंदे, डॉक्टर विकास जाधव, डॉक्टर दीपक जाधव, डॉक्टर निलेश साबळे यानीं कवी लेखक श्रीकांत देशमुख यांच्या काव्यसंग्रहाचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.