देवत्व बेकर्स सातारा, कराडची ओळख बनेल :-नामदेवराव थोरात
‘देवत्व’च्या मावा केकची चव लाजवाब : बाबुराव पवार
कराड : देवत्व बेकर्सच्या मावा केक विक्रीचा शुभारंभ प्रसंगी केक कापताना नामदेवराव थोरात, बाबुराव पवार, हरिदास सोरटे, बाळकृष्ण पाटील व मान्यवर.
कराड / प्रतिनिधी देवत्व बेकर्सने मावा केक, पाऊंड केक या अप्रतिम पदार्थांची निर्मिती केली आहे. देवत्व बेकर्स सातारा, कराडची नवी ओळख बनेल, असे गौरवोद्गार सुप्रसिध्द व्यावसायिक, शिवराज ढाब्याचे मालक नामदेवराव थोरात यांनी काढले. देवत्व बेकर्सच्या मावा केकची चव लाजवाब आहे, असे कौतुक कृष्णकमल ज्वेलर्सचे मालक बाबुराव (शेठ) पवार यांनी केले.
सातारा येथील देवत्व बेकर्सच्या मावा केकच्या विक्रीचा शुभारंभ कराड येथे थाटात झाला. व्यावसायिक नामदेवराव थोरात, बाबुराव पवार, जनसहकार उद्योग समूहाचे संस्थापक मारुतीराव मोळावडे, युवा उद्योजक निखिल शहा, पायल फुटवेअरचे प्रमुख हरिदास सोरटे, रोटरी शिक्षण संस्थेचे सचिव विलासराव पाटील- पोतलेकर, दैनिक प्रभातचे मॅनेजर अमित शिंदे, शांताई इलेक्ट्रिकल्सचे गौतम करपे, ॲड. विजयसिंह पाटील, टेक कन्सेप्ट कॉम्प्युटर्सचे संचालक शुभम पाटील, डी. बी. पाटील उद्योग समूहाचे प्रमुख विकास पाटील, देवत्व बेकर्सच्या प्रमुख अस्मिता विशाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विक्रीचा प्रारंभ झाला.
नामदेवराव थोरात म्हणाले, देवत्व बेकर्सने अल्पावधीत सातारा शहर व परिसरात नावलौकिक मिळवला आहे. ग्राहकांना दर्जेदार पदार्थ देण्यासाठी देवत्व बेकर्स प्रयत्नशील आहे. ग्राहकांची चव ओळखून, ग्राहक सेवा हा उद्देश साध्य करत देवत्व बेकर्सने वाटचाल करावी. त्यांच्या प्रयत्नांना आमची सदैव साथ राहिल.
बाबुराव पवार म्हणाले, डी. बी. पाटील उद्योग समूहाच्या माध्यमातून तांबवे, ता. कराड येथील विकास पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी टेक कन्सेप्ट कॉम्प्युटर्स, ज्ञानशीला प्ले स्कूल, ज्ञानशीला क्लिनिक, कल्पनिधी एंटरप्रायझेस, देवत्व बेकर्स सुरु केले आहे. आतोनात प्रयत्न करुन व्यवसाय स्थिरस्थावर करत आहे. स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गत तीन वर्षांपासून राबविलेले विविध सामाजिक उपक्रम आदर्शवत आहे. त्यांच्या विकासात्मक वाटचालीत आम्ही नेहमीच सोबत असणार आहोत.
सुपरब, स्वादिष्ठ, स्पाँजी…
सुपरब, लाजवाब, अप्रतिम, स्वादिष्ट, स्पाँजी, टेस्टी, मनमोहक… अशा अनेक शब्दांनी सातारकरांनी गौरविलेला हा मावा केक; मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेंगळुरू अशा अनेक शहरातील खवय्यांना मोहित केलेला हा मावा केक, आता कराडकरांनाही खुश करू लागला आहे. तुम्ही ही याचा नक्की आस्वाद घ्या असे आवाहन हरिदास सोरटे यांनी यावेळी केले.
देवत्व बेकर्सच्या मावा केकची चव सर्वोत्तम
मावा केकची सध्याची क्रेझ आहे. आम्ही अनेक बेकरीमधील मावा केकचा आस्वाद घेतला. परंतु, देवत्व बेकर्सच्या मावा केकची चव सर्वोत्तम राहिली. ड्रायफ्रूटने समृध्द असलेला मावा केकची चव मन मोहवणारी आहे. देवत्व बेकर्सचा मावा केक कराडकरांसाठी स्वादाचा प्रितीसंगम ठरेल.
विलासराव पाटील- पोतलेकर