Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

सातारा-भारत सरकार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभाग, शास्त्री भवन, नवी दिल्ली यांनी मादक पदार्थाच्या गैरवापराचा प्रतिबंध करण्याकरिता आणि भारताला अंमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टीकोनातून, नशामुक्त भारत अभियानाची (एनएनबीए) दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरूवात केली.

सदर अभियानाला ऑगस्ट 2025 रोजी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सदर अभियानाचा शेवट अमृतसर, पंजाब येथे भारत सरकार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभाग, भवन, नवी दिल्ली (DOSJE) कार्यक्रम साजरा करणार आहे व सदर कार्यक्रमाचा शेवट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

त्या अनुषंगाने दि.18 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सोबत दिलेल्या व्यसनमुक्ती बाबतची प्रतिज्ञा असणारा QR कोड स्कॅन करून प्रतिज्ञा घ्यावी. प्रतिज्ञा घेतल्यानंतर प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे. सर्वांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेवून नशामुक्त भारत अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket