जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर- जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा दि. 14 : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती यांचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याचा दि. 16 जानेवारी 2025, नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी 16 ते 20 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत. 21 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत. रविवार दि.18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाहीत.
नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचा कालावधी 16 जानेवारी ते 21 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत. रविवार दि.18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनत्र स्विकारण्यात येणार नाही. नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे. दि.22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्या पासून., वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 22 जानेवारी रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच.
उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 23 जानेवारी, 24 जानेवारी, व 27 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. रविवार दि.25 जानेवारी व सोमवार दि.26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्विकारण्यात येणार नाही.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप दि. 27 जानेवारी रोजी दुपारी 3.30 नंतर. मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 पासून. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत असा निवडणूक कार्यक्रम आहे.




