Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जिल्हा पत्रकार भवनात पहिला पत्रकार दिन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती

जिल्हा पत्रकार भवनात पहिला पत्रकार दिन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती

जिल्हा पत्रकार भवनात पहिला पत्रकार दिन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती

सातारा : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये पहिले ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा सातार्‍यातील पत्रकार दिन सोमवारी सकाळी 11.30 वाजता गोडोली येथील सातारा जिल्हा पत्रकार भवनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थित साजरा केला जाणार आहे. जिल्हा पत्रकार भवनात यंदा प्रथमच पत्रकार दिन साजरा होत आहे.

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे व प्रमुख उपस्थितांमध्ये सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रभारी उपसंचालक माहिती वर्षा पाटोळे, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट हे असणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन सातारा पत्रकार संघ, सातारा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद, जिल्हा माहिती कार्यालय, सातारा इलेक्ट्रॉनिक मीडिया सातारा तसेच सर्व संघटनांच्या संयुक्तविद्यमाने करण्यात आले असल्याची माहिती सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे यांनी दिली.पत्रकार दिनावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले जाणार आहे. यावेळी मान्यवरांचे सत्कार करुन ते मनोगत व्यक्त करणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 60 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket