कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे टाटा पंच एडवेंचर प्लस गाडीचे वितरण

दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे टाटा पंच एडवेंचर प्लस गाडीचे वितरण

दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे टाटा पंच एडवेंचर प्लस गाडीचे वितरण

सातारा : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा च्या सभासद श्वेता विजय जाधव यांना दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे टाटा पंच एडवेंचर प्लस MH11- DU4893 फोर व्हीलर गाडीचे वितरण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर संस्थेचे संस्थापक -चेअरमन शिरीष चिटणीस यांच्या शुभ हस्ते नुकतेच करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक -चेअरमन शिरीष चिटणीस, व्यवस्थापक विनायक भोसले, व्हा. चेअरमन आप्पा शालगर, भगवान नारकर, जगदीश खंडागळे, प्रदीप देशपांडे, लालासो बागवान, सुनील बल्लाळ, चंद्रशेखर बैरागी, लक्ष्मण कदम, रवींद्र कळसकर, अभिनंदन मोरे, आग्नेश शिंदे , अभिजीत देवरे, जनार्दन निपाणे , अभिजीत कुलकर्णी, रसिका सुतार, रविराज जाधव विनोद कामतेकर तसेच इतर कर्मचारी व सभासद उपस्थित होते.

या वाहन वितरण कार्यक्रमाच्या वेळी संस्थापक शिरीष चिटणीस म्हणाले दीपलक्ष्मी पतसंस्थेने सातारा शहरातील सहकारी चळवळीला एक व्यापक आधार दिला असून सभासदांची व्यक्तिगत तसेच व्यावसायिक गरज लक्षात घेऊन या सणासुदींच्या दिवसांमध्ये व्यक्तिगत वापरास तसेच व्यवसायास पूरक ठरणाऱ्या वाहनांस संस्था कर्जरूपी आर्थिक पुरवठा करून एक प्रकारे व्यवसायस चालना देण्याचे काम अविरत करत आहेत.. अशा या संस्थेने आज पर्यंत अनेक व्यवसायास पुरक ठरणाऱ्या वाहनांसाठी आर्थिक पतपुरवठा करून सभासदांची आर्थिक पत वाढवली आहे.

दीपलक्ष्मी पतसंस्था गेली 28 वर्ष ग्राहकाभिमुख धोरण राबवित असून कर्जाच्या विविध योजना तसेच घरगुती तसेच व्यावसायिक उपयोगासाठी वाहनांना कर्जरूपी आर्थिक पतपुरवठा करीत आहे .याचा समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांनी स्वयंरोजगारासाठी तसेच व्यक्तिगत वापरासाठी कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सदर प्रसंगी शिरीष चिटणीस यांनी केले…

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket