जेईई मेन परीक्षेमध्ये दिशाची उत्तुंग भरारी
वाई प्रतिनिधी -इंजिनिअरिंग एन्ट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन परीक्षेच्या पहिल्या सत्रातील निकाल जाहीर झाले असून अथर्व चौधरी हा दिशा ॲकॅडमीमधून पहिला आला आहे.
अथर्व चौधरीला सर्वाधिक ९९.५१ परसेन्टाईल मिळाले आहे. दिशाच्या २० विद्यार्थ्यांनी ९० ते ९९.५१ दरम्यान परसेन्सटाईल मिळवत उज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू केली आहे. या २० विद्यार्थ्यामध्ये पाच मुली तर १५ मुलांचा समावेश आहे. त्यामध्ये यजुवेंद्र रणवरे (९९.२३), अर्थव अडसुळ (९८.६), यशराज साळुंखे (९८.१९), शंतनु मोरे (९७.८०), अमोद धेदे (९७.११), सृजल सामंत (९७.०६), श्रेयस कातुळे (९६.५६), यश निकम (९६.४९), सुमीत घोडे (९६.४३), राजवीर माने (९४.८५), वैष्णवी महांगडे (९४.८२), तन्जीम इनामदार (९४.५१), शुभम भरणे (९४.५१), पुजा यादव (९३.८३), हर्षद बाबर (९१.८४), सुनीता मैती (९१.६४), चैतन्य देशमुख (९०.७४), अल्तमश मुजावर (९०.५४), पुर्वा पवार (९०.००)
दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.नितीन कदम म्हणाले “विद्यार्थ्यांचा स्कोअर हा एका सत्रात परीक्षेला बसलेल्या सर्वांच्या सापेक्ष कामगिरीवर आधारित आहेत. उमेदवारांना मिळालेले गुण 100 ते 0 या स्केलमध्ये सांगितले जातात. देशभरातील सर्व परीक्षांर्थीचा विचार करता निश्चितच आमच्या विद्यार्थ्यानी केलेली मेहनत आणि शिक्षकांनी दिलेले योगदान खुप मोलाचे आहे.
नितीन कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक प्रवासासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दिशाचे हे विद्यार्थी IITs, NITs, IIITs, GFTIs आणि इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी JoSAA समुपदेशन प्रक्रियेत सामील होऊ शकता, अशी माहिती यावेळी प्रा. रूपाली कदम यांनी दिली. आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच उत्तम शिक्षण संस्थेत प्रवेश मिळेल हा विश्वास त्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करताना व्यक्त केला.
दिशा ॲकॅडमीच्या शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. सतीश मौर्य सर, सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद, पालक-विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेच्या पहिल्या सत्रात घवघवीत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.