Home » राज्य » प्रशासकीय » पाचगणीच्या सर्वांगीण प्रगतीचा रोडमॅप तयार करणारे दिलीपभाऊ बगाडे — नगराध्यक्षपदासाठी लोकप्रिय उमेदवार

पाचगणीच्या सर्वांगीण प्रगतीचा रोडमॅप तयार करणारे दिलीपभाऊ बगाडे — नगराध्यक्षपदासाठी लोकप्रिय उमेदवार

पाचगणीच्या सर्वांगीण प्रगतीचा रोडमॅप तयार करणारे दिलीपभाऊ बगाडे — नगराध्यक्षपदासाठी लोकप्रिय उमेदवार

पाचगणी – निसर्गरम्य हिरवाई, आरोग्यदायी वातावरण आणि शिक्षणाची पंढरी म्हणून जागतिक ओळख असलेल्या पाचगणी शहराला विकासाचा नवा अध्याय देण्याची कुवत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे माजी उपनगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे. शांत स्वभाव, सेवावृत्ती आणि “जनतेसाठी काहीतरी करून दाखवायचे” ही त्यांची मनापासूनची जिद्द, यामुळे ते जनमानसात लोकप्रिय झाले आहेत.

दिलीपभाऊ बगाडे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले. प्रशासकीय कामकाजाचा त्यांना दीर्घ अनुभव असल्याने नागरिकांच्या अडचणी आणि गरजा समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्येष्ठ समाजसेवक भी. दा. भिलारे गुरुजी, वैकुंठवासी कळंबे महाराज, बाळासाहेब भिलारे, भाऊसाहेब भिलारे, विष्णू कासुर्डे व दशरथ बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला. व्यायाम मंडळाचे कार्यकर्ते म्हणून कबड्डी सारख्या खेळांच्या प्रोत्साहनासाठीही त्यांचे मोठे योगदान आहे.

उपनगराध्यक्ष पद भूषवताना त्यांनी पाचगणीला फक्त तालुका किंवा जिल्हा पातळीपुरते मर्यादित ठेवले नाही, तर देशपातळीवर शहराची ओळख निर्माण केली. स्वच्छ सर्वेक्षणात पाचगणीने अव्वल स्थान पटकावत ‘स्वच्छतेचा मानकरी’ म्हणून दिल्लीपर्यंत झेंडा फडकवला. त्यांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज आणि बांधकामांच्या प्रश्‍नांचे तातडीने निराकरण करण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

दिलीपभाऊंचा विकास आराखडा

पाणीपुरवठा – जुन्या योजनांना त्वरित कार्यान्वित करून मुबलक व कायमस्वरूपी पाणी उपलब्धता.

गावठाण हद्दवाढ – प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा.

स्वच्छता व पर्यटनवाढ – शहर अधिक स्वच्छ, आकर्षक आणि पर्यटनासाठी सुसज्ज करण्याचा दृढ निर्धार.

वाहतूक कोंडी उपाय – शहरात स्वतंत्र पार्किंग झोन उभारणी.

पायाभूत सुविधा – भुयारी वायरिंग, आधुनिक एसटीपी प्लांट, वस्ती सुधार योजना यांना गती.

नवे पर्यटन स्थळ – सिडनी पॉइंट ते रोपवे प्रकल्पाची अंमलबजावणी करून पाचगणीच्या पर्यटन नकाशावर नवी ओळख.

भाजी मंडई व पार्किंग मॉल – आधुनिक भाजी मंडई आणि मल्टी-लेव्हल पार्किंग सुविधांसाठी प्रयत्न.

स्वच्छतागृहे – जुन्या स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण आणि नवी दर्जेदार सुविधा; केंद्र व राज्य शासनाकडून निधीची मागणी.

शैक्षणिक सुविधा – सिद्धार्थनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, भीमनगर, शाहूनगर येथे स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका सुरू करण्याचा निर्धार.

पाचगणीच्या सर्वांगीण विकासासाठी, शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिलीप भाऊ बगाडे हे सक्षम, अनुभवी आणि दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 38 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket