कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » धोम तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाच लाखांचा निधी मंजूर – विकास शिंदे

धोम तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाच लाखांचा निधी मंजूर – विकास शिंदे

धोम तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाच लाखांचा निधी मंजूर – विकास शिंदे

वाई प्रतिनिधी-पांडवकालीन इतिहास लाभलेले आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे धोम हे गाव सध्या पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. येथे दगडी कोरीव काम असलेली मंदिरे, नक्षीकाम केलेले घाट आणि पवित्र गायमुखाचे तिर्थस्थान असून या ठिकाणी धोम्य ऋषींचे वास्तव्य होते. अशा ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वाच्या ठिकाणी विकासाची गरज असून ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

गेल्या सप्ताहात सर्वपित्री अमावस्येनिमित्त धोम घाटावर ४०० ते ५०० भाविकांनी उपस्थिती लावली होती. यात्रेचे स्वरूप आलेल्या या घाटावर भाविकांनी श्रद्धेने स्नान केले. मात्र, कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साचल्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. यापूर्वीही तत्कालीन सरपंच अविनाश नायकवडी यांच्या प्रयत्नातून काही प्रमाणात स्वच्छता झाली होती, परंतु पावसामुळे जलपर्णीचा त्रास पुन्हा वाढलेला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शाखाप्रमुख व जेष्ठ नागरिक संघ धोम यांनी शिवसेनेचे वाई  विधानसभा प्रमुख विकास अण्णा शिंदे यांची भेट घेऊन समस्यांकडे लक्ष वेधले. शिंदे यांनी तातडीने पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क साधून निधीची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे पालकमंत्री देसाई यांच्या फंडातून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी लवकरात लवकर वापरून काम सुरू करण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला असून यासाठी त्यांनी अधिकृत पत्र देऊन आराखडाही तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

या माध्यमातून पौराणिक आणि ऐतिहासिक मंदिरे, घाट, गायमुख यांसारख्या धार्मिक स्थळांचा विकास होणार आहे. यामुळे नव्या पिढीला या संस्कृतीचे दर्शन घडेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल.

या आशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून पश्चिम भागात शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास विकास शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच, शिवसेना अधिक सक्षम करण्यासाठी वाढीकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले व भविष्यात पक्ष जो आदेश देईल त्या पध्दतीने शिवसेना काम करणार असल्याचे हि सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket