ध्येय आणि प्रयत्नानेच आपण पुढे जाऊ शकतो – पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
सातारा : सातारा हे रयतचे उगमस्थान आहे. शिक्षणाचे माहेरघर आहे. रयत शिक्षण संस्थेचे कार्यक्रम हे प्रोत्साहित करणारे असतात. मी तासगाव सावळज परिसरातील गरीब शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेत पुढे आलो. आर.आर.पाटील हे आमचे मार्गदर्शक होते. विद्यार्थ्यांनी आयुष्यात एकच ध्येय ठेवा .ध्येय आणि प्रयत्नानेच आपण पुढे जाऊ शकतो’ असे मत सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे हे उपस्थित होते. तर सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी नितीन तारळकर,प्राचार्य शहाजी डोंगरे,उपप्राचार्य व मानव्य विदया शाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिलकुमार वावरे, विद्यापीठाचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक,उपप्राचार्य डॉ.सुभाष वाघमारे,उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख ,विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता,शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विक्रमसिंह ननावरे ,प्रा.अभिषेक कदम ,प्रा.आसावरी शिंदे ,डॉ.शिवाजी पाटील ,डॉ.धनंजय नलावडे ,अधीक्षक तानाजी सपकाळ इत्यादींची उपस्थिती होती.
सध्याच्या वातावरणाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी कष्टाचे काम केले पाहिजे. आज शिक्षकांचे मुले ऐकत नाहीत, शिक्षक तुमचे वैरी नसतात. मोबाईलच्या आहारी तरून मुले गेलेली आहेत. खो-खो कबड्डी हे खेळ आज गरीब मुले खेळतात ,तेच प्रक्टिस करतात ,मोबाईल मुळे आज पोस्को सारखे गुन्हे जास्त वाढले आहेत . आज सायबर गुन्हे वाढले आहेत. १८ वर्षाच्या आतील मुलीशी संवाद करताना कायद्याचे भान ठेवा. पोस्को सारखे गुन्हे गंभीर मानले जातात ,थेट सेशन कोर्टात अशी प्रकरणे चालतात. म्हणूनच कोणत्याही लफड्यात न पडता ध्येयाकडे लक्ष द्यावे. कोणाचेही खोटे फोन आले तर त्यांना कोणतीही माहिती देऊ नका. अनेकांची फसवणूक झालेली आहे. मोबाईल द्वारे वेडेवाकडे प्रकार होऊ नयेत ,यात फसवणूक होऊ शकते .असे काही घडलेच तर लगेच पोलिसांना खरी माहिती द्या ,खोटी माहिती देऊ नका ,आपली चूक झाली असली तरी पोलिसांना खरे सांगा. मुली असोत किंवा मुले तुम्हाला कोणाकडून आकस्मिक त्रास होत असेल तर पोलिसांना सांगा. ११२ नंबरला फोन करा. पोलीस फक्त सर्व काही करू शकत नाही ,तुमचे सहकार्य हवेच असते. १०८ नंबर अन्बुलांससाठी आहे.
विद्यार्थ्यांनी दररोज दोन ते तीन तास वाचन करावे. ग्राउंड वर सतत सराव करावा. पोलीस खात्यातली नोकरी हीच आज हमी देणारी नोकरी आहे. आज मुली सुद्धा पोलीस खात्यात मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. ट्रॅफिकचे नियम सर्वांनी पाळा .कायदे मोडू नका ,सराव करा आणि ध्येय साध्य करा ,असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले
जिल्ह्याचे क्रीडाधिकारी नितीन तारळकर म्हणाले की आपण थोर व्यक्तींचे चरित्र वाचले पाहिजे .अधिकाधिक शिक्षण होणे ही जमेची बाजू असते.स्पोर्ट चे विद्यार्थ्यांना नोकरीत आरक्षण आहे. खेळामुळे तुमचे सावधानता वाढते .खोखो मध्ये सेकंदात निर्णय घ्यायचे असतात. निर्णय घेण्याची क्षमतेचा विकास होतो. विविध कला प्राविण्य असायला हवे. खेळाला कोणताही धर्म नसतो. सर्व जाती धर्माचे लोक खेळ खेळू शकतात. छत्रपती शिवाजी कॉलेज हे स्पोर्टसमनची खाण आहे’ . असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे म्हणाले की रयत शिक्षण संस्थेबद्दल सर्वाना ओढ आहे,त्याचे कारण कर्मवीरांच्या पासून लोकशिक्षणाचे काम रयत शिक्षण संस्थेने केले आहे. महाराष्ट्राला संस्कार देण्याचे काम संस्थेने केले आहे. मस्के साहेब व तारळकर यांनी हाडाच्या शिक्षकाच्या तळमळीने मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रारंभी महात्मा जोतीराव फुले,कर्मवीर ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे यांनी केले विविध क्षेत्रात यश मिळविल्या विद्यार्थ्यांना या मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ,सूत्र संचालन डॉ.विद्या नावडकर व प्रा.राजेंद्र तांबिले यांनी केले आभार डॉ.धनंजय नलवडे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली
