Post Views: 105
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, तब्येतीची केली विचारपूस
प्रतिनिधी -मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकाश आंबेडकर यांची अँजिओप्लास्टी झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी फोनद्वारे प्रकाश आंबेडकर यांची विचारपूस केली. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौर्यावर होते. त्यावेळी शिवाजीनगर येथील प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन अजित पवार यांनी तब्येतीची विचारपूस केली.




