(पाचवड) ते चिंधवली ते भिवडी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी
सातारा -नागरिकांनी थेट निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम बंद पाडले.प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत (पाचवड) ते चिंधवली ते भिवडी आर एच व्ही ते कारखाना रस्ता खडीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा नागरिकांनी रोष व्यक्त करत थेट कामच बंद पाडले.
ठेकेदारामार्फत संबंधित पूर्वीच्या रस्त्यावर थेट खडीकरण पावसाळ्यामध्येच सुरू केले होते. यावर गावातील रहिवासी एकत्र होत आम्हाला रस्ता मजबूत पाहिजे.हा रस्ता जास्त काळ टिकणार नाही, काम निष्कृष्ट होत आहे, दर्जा चांगला पाहिजे, असे म्हणत थेट कामच बंद पाडले. रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी चिंधवली ग्रामस्थांनी केली आहे.
सदर कामी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे सिध्द होत आहे. यामुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होऊ शकते.सदर ठिकाणी चिखलामध्येच खडी टाकल्याने ती रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरली आहे. यामुळे वारंवार अपघात घडत आहे. ऐन पावसाळ्यातच रस्त्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी संबंधित सातारा येथील अधिकाऱ्यांना तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्यांना या ठिकाणी निकृष्ट काम असल्याची खात्री पटली आहे.
सदर तक्रारी मध्ये रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे खडीकरण करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे व रस्ता शासनाने दिलेल्या नियमावली प्रमाणे करण्याची सुध्दा मागणी केली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे चिंधवली येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून येणाऱ्या काळात संबंधितावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
आमची उपासना रस्त्याची जोपासना या उक्तीप्रमाणे काम करण्याची आमची मागणी असून रस्त्याच्या कामाबाबत कोणताही हलगर्जीपणाग्रामस्थ सहन करणार नसून संबंधितावर कार्यवाही करावी.
नितीन पवार (माजी सैनिक )
