शिंदोळा बस स्टॉप आणि काळा कडा रस्त्यावरील धोकादायक वळणांवर संरक्षण कटडा आणि डांबरी रस्ता बांधण्याची मागणी.
महाबळेश्वर: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतिने बांधकाम विभाग उप अभियंता मेढा जावली यांना निवेदन देऊन शिंदोळा बस स्टॉप पुढील चोर पाणी झरा येथील धोकादायक वळण आणि काळा कडा रस्त्यावरील वळणावर संरक्षण कटडा आणि डांबरी रस्ता बांधण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिंदोळा बस स्टॉप पुढील चोर पाणी झरा येथील वळण अतिशय धोकादायक आहे आणि अनेक अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच, काळा कडा रस्त्यावरील वळणावर डांबरी रस्ता आणि सिमेंटचा रस्ता यांच्यामध्ये अंतर असल्यामुळे वाहनांना वारंवार अडथळा निर्माण होतो. पावसाळा जवळ येत असल्याने या दोन्ही ठिकाणी तातडीने संरक्षण कटडा आणि डांबरी रस्ता बांधणे आवश्यक आहे.
निवेदन देण्यास तालुकाप्रमुख संतोष आप्पा जाधव, उप तालुकाप्रमुख राजाभाऊ घाडगे, महाबळेश्वर शहरप्रमुख राजूभाऊ गुजर, उपशहर प्रमुख उस्मान भाई खारखंडे, सचिन चव्हाण आणि अमोल साळुंखे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.