दिल्ली रेल्वेस्टेशनवर मोठी दुर्घटना ! चेंगाराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
प्रतिनिधी – नवी दिल्ली येथे शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर झालेल्या चेंगराचेंगरीत 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री (15 फेबुवारी) हि मोठी दुर्घटना घडली आहे. तसेच या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यात दोन ट्रेन उशीरा आल्याने गर्दीत मोठी वाढ झाली. दिल्ली रेल्वे स्टेशनवर दर तासाला जनरलची तिकिटे मोठ्या प्रमाणात विकली गेली. ४०० जागांसाठी तब्बल १५०० तिकिटांची विक्री झाली, त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यातूनच ही चेंगराचेंगरीची दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ महिलांचा समावेश आहे. तसेच या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर एलएनजेपी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १४ वर रात्री १० ते ११ वाजेदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून या दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
