Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दीपलक्ष्मी पतसंस्थेची दिनदर्शिका हा स्तुत्य उपक्रम – डॉ.दिलीप गरुड

दीपलक्ष्मी पतसंस्थेची दिनदर्शिका हा स्तुत्य उपक्रम – डॉ.दिलीप गरुड

दीपलक्ष्मी पतसंस्थेची दिनदर्शिका हा स्तुत्य उपक्रम – डॉ. दिलीप गरुड

सातारा दि. 5 (प्रतिनिधी)दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून शिरीष चिटणीस व त्यांचा स्टाफ मिळून वेगवेगळे चांगले उपक्रम राबवत असून दीपलक्ष्मी पतसंस्थेची दिनदर्शिका 2025 हा स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन कार्यवाह, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य परिषद, पुणे डॉ.दिलीप गरुड यांनी केले.सदर कार्यक्रमास कार्यवाह म.सा.प.पुणे शिरीष चिटणीस, संचालक भगवान नारकर, आप्पासो शलगर प्रदीप देशपांडे, अनिल चिटणीस, जगदीश खंडागळे चंद्रशेखर बैरागी तसेच व्यवस्थापक विनायक भोसले मान्यवर उपस्थित होते.

     यापुढे बोलताना डॉ. दिलीप गरुड म्हणाले संस्था सहकारात काम करत असताना विविध चांगले उपक्रम नेहमीच राबवत असते . संस्था साहित्यिक,सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांना नेहमीच मदत करणे व जाहिरातीवर विना कारण पैसे खर्च न करणारी एक आदर्श पतसंस्था आहे.

    मी एक शिक्षक असल्यामुळे आतापर्यंत पुस्तकाचेच प्रकाशन माझ्या हस्ते झाले होते. परंतु आज शिरीष चिटणीस यांच्यामुळे माझ्या हातून प्रथमच एका दिनदर्शिकेचे प्रकाशन होत आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब असून या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले असे आनंदाने जाहीर करतो. या संस्थेच्या नावामध्ये दीप हे तेजाचे प्रतीक आहे. आणि लक्ष्मी ही तर सर्वांनाच हवी असते. तिच्यासाठी तर हा जीवनाचा उठा रेटा चालला आहे. जर आपल्या सर्वांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये जर लक्ष्मी असेल तरच सुख समाधान टिकते. संस्था गेली वीस वर्ष दिनदर्शिका प्रकाशनाचा हा उपक्रम राबवत असून या उपक्रमशीलतेला मी धन्यवाद देतो असे म्हणाले.

शिरीष चिटणीस म्हणाले महाराष्ट्र मध्ये जाहिरात बाजीसाठी पैसे खर्च न करणारी पतसंस्था म्हणून दीपलक्ष्मी पतसंस्थेचा उल्लेख होतो. पतसंस्था दरवर्षी नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन करत असते यामध्ये संस्थेचे ठेवीदार सभासद कर्जदार ही मंडळी या दिनदर्शिकेची वाट बघत असतात. हे सर्व श्रेय स्टाफचे आहे.

     संस्था चालवत असताना काळानुरूप नेहमी बदल स्वीकारावे लागतात. एक काळ असा होता की पतसंस्थेकडे कर्जदार येऊन थांबत होते. परंतु आज असंख्य बँका व पतसंस्थांमुळे कर्ज सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत पतसंस्थेचे वाढ ही त्या पतसंस्थेच्या स्थापच्या हातात आहे.

  या संस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणजे गेली दहा वर्षापेक्षा जास्त या संस्थेत स्टाफ भरलेला नाही तरी हे सर्व सभासद तसेच ठेवीदार यांच्या विश्वासामुळे शक्य झाले. त्यामुळे संस्थेचा स्टाफ हा ग्राहकांशी निगडित आहे.

     संस्था आर्थिक काम करत असताना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्व समावेशक कामे करत असते.

या पतसंस्थेच्या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर पाहिले असता विविध मान्यवरांचे संस्थेने घेतलेले कार्यक्रम दिसत आहेत त्या व्यक्तींचा संस्थेशी संबंध आलेला आहे. अशा पद्धतीने इतरही पतसंस्थांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध समाजपयोगी करणारी व जवळपास 50 कोटी रुपयांच्या ठेवी असणारी दीपलक्ष्मी पतसंस्था ही अतिशय सक्षमपणे ही संस्था उपक्रम राबवत आहे.डॉ.दिलीप गरुड यांनी 30 पुस्तके लिहिली आहेत तसेच दिवाळी अंक लिहिले आहेत.

दिनदर्शिकेतील प्रत्येक पानावर असले छायाचित्र पाहून संस्थेमध्ये एवढे साहित्यिक कार्यक्रम घेतले असून या दिनदर्शिका मध्ये असलेली उपयुक्त माहिती ही महत्त्वाचा दस्तावेज आहे असे म्हणाले.

  डॉ. राजेंद्र माने म्हणाले दिनदर्शिका ही प्रत्येकाच्या आयुष्याची निगडित असणारा एक भाग आहे. आपल्या आयुष्याचे जसे आपण पहिले पान उघडतो त्याचप्रमाणे दिनदर्शिकेचे पहिले पान महत्त्वाचे असते.जीवनामध्ये आपल्या आयुष्यात विविध प्रकारची माणस येत असून ती माणसे आपले आयुष्य समृद्ध करतात. प्रत्येक वर्षी ते आपल्याला नवीन देऊन जात असतात. जसे सुखाचे क्षण असतात त्याचप्रमाणे दुःखाचे क्षण असतात पण ते आपल्या ला मोठ्या धिराने स्वीकारावे लागतात. त्यांना टाळता येत नाही. या दिनदर्शिकेमध्ये कितीतरी कार्यक्रमाच्या छायाचित्रांच्या आठवणी संमंधी माहिती आहे. तसेच थोर माणसांच्या जयंत्या ,पुण्यतिथी असतात तसेच त्या संबंधीची उपयुक्त माहिती असते. या सर्वाला आयुष्य कुठेतरी बांधलेले असते.

     जेव्हा आपण कॅलेंडरचे शेवटचे पान म्हणजे डिसेंबर उलट तो तेव्हा वर्षभरामध्ये किती माणसांशी चांगले वागलो किती माणसांबरोबर मनाचा मेळ घातला गेला किती माणसांना कळत नकळत दुखवले गेले याचा हिशोब म्हणजेच दिनदर्शिका होय. शेवटच्या महिन्याचे पान उलटून जेव्हा आपण आधीचा महिना पाहतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात प्रगतीची रेषा उमटली आहे का हे कळते.

  शिरीष चिटणीस साहेबांच्यामुळे अनेक प्रकारची माणसे भेटली असून त्या व्यक्तीकडून मी काही ना काहीतरी शिकलो आहे या शिकण्याचा लेखाजोखा म्हणजेच दिनदर्शिका होय या दिनदर्शिकेच्या माध्यमातून वर्षभर होणारे कार्यक्रम आपल्या विविध पहावयास मिळतात त्याचा उपयोग संस्थेच्या सर्व ठेवीदार कर्जदार हितचिंतकांनी आपल्या दैनंदिन जीवनात करावा असे आवाहन केले.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक भोसले यांनी केले असून प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले व आभार आग्नेश शिंदे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी, प्रल्हाद पार्टे गौतम भोसले,असलम बागवान, ,व्यवस्थापक रवींद्र कळसकर शाखाधिकारी अभिनंदन मोरे, आग्नेश शिंदे, लक्ष्मण कदम,सागर पोगाडे, तसेच अभिजीत देवरे, जनार्दन निपणे, अनिल मसुरकर, सचिन शिंदे, विनोद कामतेकर, रविराज जाधव, प्रवीण सपकाळ, शुभम बल्लाळ तसेच. उपस्थित होते

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील तरुणीवर चाकू हल्ला होत असताना पाहत होती लोकं  

Post Views: 363 पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील  पुणे : पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीच्या खुनाचा करण्यात आला होता.आर्थिक

Live Cricket