Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दीपलक्ष्मी पतसंस्था सहकारात आदर्शवत काम करत आहे – शिरीष चिटणीस 

दीपलक्ष्मी पतसंस्था सहकारात आदर्शवत काम करत आहे – शिरीष चिटणीस 

दीपलक्ष्मी पतसंस्था सहकारात आदर्शवत काम करत आहे – शिरीष चिटणीस  

सातारा – दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा शहरात आर्थिक तसेच सामाजिक बांधीलकी जपून सहकारात आदर्शवत काम करत आहे. असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा च्या 27 व्या वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेल्या छोटे खाणी कार्यक्रमात व्यक्त केले.सदर प्रसंगी संस्थेचे संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस, संचालक अनिल चिटणीस, भगवान नारकर, आप्पा शालगर,संचालिका  सौ.शिल्पा चिटणीस, सुनील बल्लाळ, जगदीश खंडागळे,व्यवस्थापक विनायक भोसले शाखाधिकारी लक्ष्मण कदम आग्नेश शिंदे, सागर पोगाडे मान्यवर उपस्थित होते.यापुढे बोलताना म्हणाले दीपलक्ष्मी पतसंस्था ही शहर व परिसरात सहकारा बरोबरच सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक तसेच वाचक चळवळ वाढवण्यासाठी भरघोस प्रयत्न करणारी एकमेव अग्रगण्य पतसंस्था आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे संस्था आपले आर्थिक कार्य पार पाडत असताना शहरात स्वतःची संस्कृती ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.

       या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की समाजातील सर्व घटकाला जवळून बँकिंग ची सेवा दिली जावी यासाठी संस्थेने सातारा शहरात 7 शाखा शहराच्या विविध प्रभागात स्थापन केल्या असून त्या उत्तमरीत्या कार्यरत आहेत. सस्थेच्या आजमितीस जवळपास 50 कोटीच्या ठेवी झाल्या आहेत. या जमा झालेल्या ठेवीतून समाजातील सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक, तसेच व्यवसाय संबंधित वाहनांसाठी जवळपास 35 कोटीची कर्जवाटप केले असून तरल ते पोटी 15 कोटीच्या ठेवी शहरातील विविध बँकांमध्ये ठेवल्या आहेत.     

दीपलक्ष्मी पतसंस्था सहकारात काम करत असताना सभासदांची आर्थिक पत सुधारण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहे. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी संस्था नवनवीन उपक्रम राबवत आहे. तसेच चर्चासत्रे, मान्यवर व्यक्तीची व्याख्याने, पुस्तक प्रकाशन, गीत मैफिल कार्यक्रम, आर्ट गॅलरीचे उद्घाटन यासारखे कार्यक्रम घेऊन समाजाला एक आर्थिक दिशा देण्याचे काम अविरत करत आहे. संस्थेने यशस्वी 27 वर्षे पूर्ण केले असून 28 व्या वर्षात पदार्पण करत आहे. उपस्थित होते.

वर्धापन दिना दिवशी आर्थिक, सामाजिक,साहित्य,कला संस्कृती, क्षेत्रातील विविध मान्यवरांनी संस्थेला सदिच्छा भेट दिली.सदर वर्धापन दिना दिवशी अभिजीत देवरे,जनार्दन निपाने, सचिन शिंदे, विनोद कामतेकर, रविराज जाधव, प्रवीण सपकाळ रसिका सुतार तसेच पिग्मी एजंट उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा शहरातील कायम दुर्लक्षित शाहूनगर मधील पाणी समस्या गंभीर 

सातारा शहरातील कायम दुर्लक्षित शाहूनगर मधील पाणी समस्या गंभीर  सातारा –  शाहू नगर मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी समस्या ही

Live Cricket