दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेचा आज 23 वा वर्धापन दिन
सातारा दि.1 : (प्रतिनिधी)दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाहूपुरी शाखेचा 23 वा वर्धापन दिन आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता 383 ब,38 करंजे तर्फ, शाहूपुरी चौक येथील स्व:वास्तुत संपन्न होणार आहे.सदर वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या या शाखेने
श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. तरी संस्थेचे ठेवीदार, सभासद ,कर्जदार, हितचिंतकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा.दीपलक्ष्मी पतसंस्था समाजामध्ये करत असलेल्या आपल्या आदर्शवत कामाने तसेच सामाजिक बांधिलकीपोटी करत असलेले विविध उपक्रमाने आपल्या कार्याचा आलेख दिवसें दिवस उंचावत आहे. अशा अल्पावधीत नावारूपास आलेल्या संस्थेच्या शाहूपुरी शाखेच्या प्रगतीचा आढावा घेताना शिरीष चिटणीस म्हणाले संस्थेच्या या शाखेने 4 कोटी 20 लाख रुपयेच्या ठेवी समाजातून गोळा केले असून 3 कोटी रुपये समाजातील गरजू व्यक्तींना वाटप केले आहे. व तरल ते पोटी 1 कोटी 20 लाख रुपयाची गुंतवणूक विविध बँकेमध्ये केली. या संस्थेने एकूण 40 कोटी रुपयाच्या ठेवीचा टप्पा जवळपास गाठला आहे.
तरी आपण ठेवीदार, सभासद,कर्जदार, हितचिंतकांनी शाहूपुरी शाखेच्या 23 वर्धापन दिना दिवशी आयोजित केलेल्या श्री सत्यनारायण पूजेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.शाखेने यशस्वी 23 वर्षे पूर्ण केली असून 24 वर्षात शाखा पदार्पण करत आहे.
