Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » दीपलक्ष्मी पतसंस्थेचा 28 वा वर्धापनदिन स्व:वास्तुत संपन्न होणार

दीपलक्ष्मी पतसंस्थेचा 28 वा वर्धापनदिन स्व:वास्तुत संपन्न होणार

दीपलक्ष्मी पतसंस्थेचा आज 28 वा वर्धापनदिन स्व:वास्तुत संपन्न होणार

सातारा दि.5 (प्रतिनिधी)दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचा 28 वा वर्धापन दिन शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025. “अनंत चतुर्दशी” रोजी 759 अ,शनिवार पेठ, कन्याशाळेच्या पाठीमागे सातारा येथे आयोजित करण्यात आलेला आहे.सदर वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेने श्री सत्यनारायणाची पूजा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित केली आहे.          

         तरी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार तसेच हितचिंतकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.दीपलक्ष्मी पतसंस्था ही शहर व परिसरात सहकारा बरोबरच सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राच्या, तसेच वाचक चळवळ वाढवण्यासाठीभरघोस प्रयत्न करणारी अग्रगण्य पतसंस्था आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे ही संस्था आपले आर्थिक कार्य पार पाडत असताना शहरात स्वतःची संस्कृती ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. 

सामान्य माणूस हा केंद्रबिंदू म्हणून ठेवीदार, कर्जदार, भागधारक, यांना सहकारातून हातभार मिळावा या उद्देशाने संस्थेची स्थापना संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस यांनी दिनांक 6 सप्टेंबर 1997 रोजी केली होती. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली 28 वर्षाच्या कालावधीत केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की समाजातील सर्व घटकाला जवळून बँकिंग ची सेवा दिली जावी यासाठी संस्थेने सातारा शहरात 7 शाखा शहराच्या विविध प्रभागात स्थापन केल्या असून त्या उत्तमरीत्या कार्यरत आहेत. 

संस्थेच्या आज मितीस जवळपास 40 कोटीच्या ठेवीझाल्या आहेत. या जमा झालेल्या ठेवीतून समाजातील सुशिक्षित बेरोजगार, व्यावसायिक, तसेच व्यवसाय संबंधित वाहनांसाठी जवळपास 28 कोटीची कर्जवाटप केले असून तरल ते पोटी 12 कोटीच्या ठेवी शहरातील विविध बँकांमध्ये ठेवल्या आहेत.

        दीपलक्ष्मी पतसंस्था सहकारात काम करत असताना सभासदांची आर्थिक पत सुधारण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहे. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी संस्था नवनवीन उपक्रम राबवत आहे. व समाजाला एक आर्थिक दिशा देण्याचे काम अविरत करत आहे.संस्थेने यशस्वी 28 वर्षे पूर्ण केले असून 29 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 118 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket