दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि यादे सिने संगीत क्लब सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुनहरे नगमे’ हा सुश्राव्य गाण्यांची मेहफिल
सातारा -दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि यादे सिने संगीत क्लब सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुनहरे नगमे’ हा सुश्राव्य गाण्यांची मेहफिल रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ, सातारा येथे आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमास सुरेखा शेजवळ, ममता नरहरी, ईकबाल शेख, मोहन पुरोहित, शिरीष चिटणीस, मुकुंद फडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच सदर कार्यक्रम मुकुंद पांडे, विजय साबळे, अरुण कुलकर्णी, महेश बुटे, विजया चव्हाण, ज्योती साळुंखे, आरती वाणी हे कलाकार सादर करणार आहेत. ॲड. स्नेहल कुलकर्णी या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. तसेच सदर कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था सचिन शेवडे व अक्षता शेवडे हे करणार आहेत.तरी या गाण्यांच्या मेहफिलीस सर्व सातारकर रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.
