वाई नगरपालिका भाजपाच्या ताब्यात; दीपकदादा ननावरे ठरले विजयाचे सूत्रधार
तरुण –ज्येष्ठांची मोट बांधून दीपकदादा ननावरे यांचा भाजपासाठी मोठा विजय
वाई प्रतिनिधी — वाई नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल सावंत यांनी विजय संपादन करत नगराध्यक्ष होण्याचा बहुमान पटकावला. यासोबतच भाजपाचे १० नगरसेवकही निवडून येत पक्षाची ताकद स्पष्ट झाली आहे.
या विजयामागे भाजपाचे वाई तालुकाप्रमुख दीपकदादा ननावरे यांच्या तरुण आणि प्रभावी नेतृत्वाची निर्णायक भूमिका ठरली. मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दीपकदादा ननावरे यांनी तरुण व ज्येष्ठांची मजबूत मोट बांधत भाजपासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या कुशल नियोजनामुळे नगराध्यक्ष पदासह दहा उमेदवार निवडून आणण्याचा नवा इतिहास वाईत घडला. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने अनिल सावंतांना डावलेली भूमिका लक्षात घेऊन दीपकदादा ननावरे यांनी त्यांना भाजपामध्ये प्रवेश करून घेऊन त्यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करून भाजपासाठी विजय सुकर केला.
मंत्री जयकुमार गोरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख आहे. वाई तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले दीपकदादा ननावरे राजकीय हवेचा अंदाज बघून बांधणी करत असतात. भाजपाचा तरुण आश्वासक चेहरा म्हणून भाजपा वाई तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची भरीव कामगिरी स्पष्ट दिसत आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस झटणारा तरुण नेता म्हणून वाई तालुक्यात दीपकदादा ननावरे यांचे नाव आदराने घेतले जाते. तरुण-ज्येष्ठांची सांगड घालत त्यांनी यापूर्वीही अनेक निवडणुकांत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना पराभूत केले आहे.
दरम्यान, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दीपकदादा ननावरे अधिक सक्रिय झाले असून, भाजपाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराला गती देण्याचा त्यांचा निर्धार आहे. वाईतील या विजयामुळे आगामी निवडणुकांत भाजपाला बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



