Post Views: 63
दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचेमार्फत १० व्हॅक्सिन कॅरियर प्रदान
वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेसाठी ग्रामीण रुग्णालय वाई यांना दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत डॉक्टर महेश मेणबुदले यांचे हस्ते १० व्हॅक्सिन कॅरियर प्रदान करणेत आले.वैद्यकिय अधिक्षक डॉक्टर वारूंजकर ,डॉ. योजना तराळ,दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे विश्वजित मेणबुदले,श्रीकांत वालेकर,आप्पा राऊत,सुधीर पिसाळ, आरोग्य पर्यवेक्षक अजित जगताप,व ग्रामीण रूग्णालय वाई कर्मचारी उपस्थित होते. दत्तात्रय पांडुरंग मेनबूदले प्रतिष्ठान वाई तर्फे अनेक सामाजिक उपक्रम वाई तालुक्यांमध्ये आयोजित केली जात असतात. डॉक्टर महेश मेनबुदले यांच्या नेतृत्वात प्रतिष्ठानन सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत.
