कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » ठळक बातम्या » कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज —वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू शहर अध्यक्ष अमित जाधव यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज —वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू शहर अध्यक्ष अमित जाधव यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती 

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज —वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू शहर अध्यक्ष अमित जाधव यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती 

 कराड: कराड नगरपालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. शहरात “काँग्रेसचे अस्तित्व आहे का?” अशी चर्चा सध्या सुरू असली तरी, गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निर्णायक मते मिळाल्याचे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रियपणे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कराड शहर काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक तयारी केली जात आहे.

“जरी काँग्रेससाठी सध्या संघर्षाचा काळ असला, तरी पक्षाची वैचारिक परंपरा आणि जनतेशी असलेले नाते या संघर्षातून निश्चितच नवा मार्ग काढेल,” असा विश्वास काँग्रेसचे कराड शहर अध्यक्ष ऍड. अमित जाधव यांनी व्यक्त केला.

त्यांनी पुढे सांगितले की, “कराड शहरात काँग्रेसचा भक्कम कार्यकर्ता वर्ग आहे. विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन करेल.”

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket