कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडींना क्लीन चीट
काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणात ईडीकडून क्लीनचीट दिल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. 2010 साली कॉमनवेल्थ घोटाळा झाल्याचे सुरेश कलमाडी यांच्यावरती राजकीय आरोप झाले होते. त्यानंतर सुरेश कलमाडी यांचं राजकीय अस्तित्व संपलं. मात्र, तब्बल 15 वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. ईडीकडून न्यायालयामध्ये या प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर पुण्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.
2010 साली कॉमनवेल्थच्या आयोजनात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सध्याच्या प्रकरणासह अनेक गुन्हे व मनी लॉड्रिंगची प्रकरणे दाखल होती. दोन महत्त्वाच्या करारांचे वाटप आणि अंमलबजावणीत सुरेश कलमाडी व इतरांवर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलेला होता. विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी म्हटले, सीबीआयने भ्रष्टाचाराचा खटला आधीच बंद केला. ईडीने मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली आणि अहवाल स्वीकारला आहे.
