Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शाहूपुरी ते दिव्य नगरी मार्गावरील पुलाचे काम संथ गतीने. नागरिक व वाहन चालक त्रस्त.

शाहूपुरी ते दिव्य नगरी मार्गावरील पुलाचे काम संथ गतीने. नागरिक व वाहन चालक त्रस्त.

शाहूपुरी ते दिव्य नगरी मार्गावरील पुलाचे काम संथ गतीने. नागरिक व वाहन चालक त्रस्त.

शाहूपुरी ते दिव्य नगरी मार्गावरील पुलाचे काम संथ गतीने. नागरिक व वाहन चालक त्रस्त. मार्गावर अपघाताचा धोका वाढला. सातारा… शाहूपुरी ते दिव्य नगरी मार्गावरील माळवाडी नजीक उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम गेल्या पाच महिन्यापासून संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिक व वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सातारा मेढा जुना हायवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावर वाहनांची व नागरिकांची ये जा मोठ्या प्रमाणात असते.

सततचा हा वर्दळीच्या मार्गावर पुलाचे काम मध्यंतरीच्या काळात रखडल्याने वाहन चालक व नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. सध्या या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे ठरू पाहत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या परिसरात पूर्णपणे अंधाराचे साम्राज्य असल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका अधिक संभवतो त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना संबंधित यंत्रणेने केली नसल्याचे दिसून येत आहे. मुळात पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वामुळे शाहूपुरी दिव्य नगरी भागातील अनेक विकासाची कामे मार्गी लागले आहेत. लाईट पाणी रस्ते तसेच मूलभूत सुविधा या भागात नागरिकांना प्राप्त झाल्याने या परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोट… शाहूपुरी ते दिव्य नगरी हा संपूर्ण निसर्गरम्य परिसर असून स्वच्छ व सुंदर हवामानामुळे या परिसरात नागरी वस्ती झपाट्याने वाढू लागली आहे. नागरी सुविधा गतिमानतेने होत असल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अनेक गृहनिर्माण प्रकल्प येथे उभे राहत असल्याने या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

सध्या सातारा शहरात तसेच मेढा कडे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने अनेक वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. सध्या येथे पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे संबंधित यंत्रणेने त्वरित पुलाचे काम करून नागरिकांना व वाहन चालकांना दिलासा द्यावा.

श्रीरंग काटेकर सातारा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket