Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » चित्रकलेच्या छंदातील करिअरच्या विविध संधीची मांडणी करणारे अनोखे कला प्रदर्शन दि. २८ मार्च पासून-साताऱ्यात

चित्रकलेच्या छंदातील करिअरच्या विविध संधीची मांडणी करणारे अनोखे कला प्रदर्शन दि. २८ मार्च पासून-साताऱ्यात

चित्रकलेच्या छंदातील करिअरच्या विविध संधीची मांडणी करणारे अनोखे कला प्रदर्शन दि. २८ मार्च पासून-साताऱ्यात

प्रतिनिधी : सातारा येथे दिनांक 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार वाजता दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या सहकार्याने दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह कन्याशाळे पाठीमागे सातारा शहर येथे एक अनोखे चित्र प्रदर्शन आयोजीत केले जात आहे,गेल्या सहा वर्षांपासून बारामती स्थित कलासंस्कार स्टुडिओ येथील कलेतील / डिझाईन क्षेत्रातील प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन भरवण्याची अनोखी संकल्पना या स्टुडिओचे डायरेक्टर श्री सचिन कदम सर यांनी या चित्रपटदर्शनाद्वारे मांडली आहे ,या चित्रपटदर्शनाचे उद्घाटन दिनांक 28 मार्च रोजी दुपारी चार वाजता प्राध्यापक श्री राजेंद्र निकम सर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ शिल्पा चिटणीस मॅडम ,प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर ,माननीय श्री नारायण रामचंद्र पवार तसेच प्राचार्य श्री विजयकुमार धुमाळ हे उपस्थित राहणार आहेत यावेळी या कला संस्कार स्टुडिओ बारामतीतील प्रवेशित प्रथम वर्ष इ.11 वी व द्वीतीय वर्ष इ.12 वी या दोन वर्षातील विद्यार्थ्यांनी घडवलेल्या विविध चित्रकृतींचे कला विषयांवरील चित्र प्रदर्शन दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह येथे दि. 29 मार्च ते 31 मार्च अखेर सकाळी 10 ते सायंकाळी 08 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे यादरम्यान कलेतील उच्च शिक्षणाच्या दृष्टीने व संलग्न अशा नाटा, जे ई.ई.2 ( आर्किटेक्चर ) एम. एच.ए. ए. सी.ई. टी ,एन.आय. डी. युसिड,निफ्ट, ( NATA, JEE -2, MAH- AAC – CET, NID, UCEED, NIFT ) अशा डिझाईन करिअरशी संलग्न उच्च शिक्षणातील वेगवेगळ्या करिअरशी संबंधित देश पातळीवरील तसेच राज्य पातळीवरील बारावी नंतरच्या करिअरच्या संधीशी संबंधित विविध प्रवेश परीक्षांमध्ये करावी लागणारी पुर्वतयारी या दृष्टीने विविध पद्धतीचे काम व त्याची तयारी याची अनोखी कलात्मक मेजवानी या चित्रप्रदर्शनाच्या दृष्टिने उपलब्ध होत आहे.

याबाबत बारामती येथे हा कला संस्कार स्टुडिओ सुरू होऊन आज रोजी सहा वर्षे पूर्ण झाली आहेत यामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी वर्ग हे आज महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील विविध शासकीय महाविद्यालयांमधे डिझाईनशी संलग्न विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित आहेत यामध्ये विद्यार्थ्यांमधील कलात्मक अभिरुची ला ओळखून त्यांची सातत्याने दोन वर्ष त्यादृष्टीने प्रत्यक्ष तयारी करून घेणे तसेच उन्हाळ्याची सुट्टी व दिवाळीची सुट्टी यामध्ये दीर्घकालीन कार्यशाळा घेणे या द्वारे यातील विद्यार्थांच्या कला कल्पना, सर्जन, कला निर्मितीच्या दृष्टीने आत्मविश्वास निर्माण करणे इत्यादी गुणांचा कला संस्कार कसा वाढीला लागेल यासाठी कला संस्कार स्टुडिओ द्वारे विशेष लक्ष दिले जाते, या दोन वर्षभरातील हे अभ्यासक्रम सामूहिक नसून व्यक्तिगत असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत प्रगतीनुसार ज्या त्या विद्यार्थ्याला आपल्या प्रगतीचा वेग साधता येणे व त्यामध्ये अपेक्षित पुढील शैक्षणिक संधी समजावून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे याकडे स्टुडिओ विशेषत्वाने लक्ष देतो कलेतील जुना वारसा जपणे, विविध कलाशैली अभ्यासणे ,विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रकारांची कला प्रात्यक्षिके प्रदर्शने स्टुडिओ पाहणे तसेच नामवंत कलादालने, नामवंत चित्रकार, शिल्पकार ,आर्किटेक्ट, ॲनिमेटर, इलेस्ट्रेटर यांच्याशी प्रत्यक्ष व समन्वय साधून विद्यार्थ्यांना डिझाईन करिअरमधील विविध शाखांमधे उच्च शिखरावर पोहोचण्यासाठी पायाभरणीचे काम कलासंस्कार स्टुडिओ मार्फत केले जात आहे, बारामती मध्ये या विद्यार्थ्यांचे कलाकृतीचे एक छोटे दालनही या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहे या दृष्टीने उच्च कलाविद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग तसेच स्वतः कला संस्कार स्टुडीओचे डायरेक्टर – चित्रकार सचिन दादासाहेब कदम हे जातीने लक्ष घालून या विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने डिझाईन करिअरशी सलग्न कलेतील विविध उच्च पदवी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांची नियोजन पूर्व योग्य ती तयारी बारामती येथे प्रत्यक्ष करून घेत आहेत या दृष्टीने सातारा मधील या करिअरसाठी इच्छुक विद्यार्थी, जिज्ञासू पालक यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून सदर करिअरची संधी तसेच या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या कामाची तयारी असा दुहेरी हेतू या प्रदर्शनाच्या माध्यमातून साध्य होत आहे तसेच या क्षेत्राशी संबंधित शैक्षणिक संधीसाठी इच्छुक विविध शाखांमधे आकरावी व. बारावी मध्ये प्रवेशित विद्यार्थी तसेच बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या कला प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कला संस्कार स्टुडिओ बारामतीचे सचिन दादासाहेब कदम यांच्यामार्फत करण्यात आले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket