चिंधवलीत शेकडो दिव्यांनी कृष्णामाई उजळली
तरुणाईने केले दीपदान
सातारा (दीपक पवार )-चिंधवली ता.वाई येथे आज कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी ६:३० वाजता या शुभमुहूर्तावर चिंधवलीतील युवक-युवतींनी पवित्र असणाऱ्या कृष्णानदी मध्ये दीपदान केले. त्यामुळे कृष्णामाई शेकडो दिव्यांनी उजळून निघाली.
कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी घर, मंदिरे, पिंपळाची झाडे आणि तुळशीच्या झाडांजवळ दिवे लावले जातात आणि गंगासारख्या पवित्र नद्यांमध्ये दिवे दान करतात. आणि आपल्या सर्वांसाठी संथ वाहणारी कृष्णामाई पवित्र असल्याने दीपदान करण्याचे योजिले होते.
रात्री चंद्राची पूजा करतात, या दिवशी गायीला खाऊ घालतात तसेच कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्याला विशेष महत्त्व असल्याने धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सर्व देवी-देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि नद्यांच्या काठावर दिवाळी साजरी करतात. त्यामुळे या देवाला दिवाळी असेही म्हणतात आणि त्याच अनुषंगाने त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून कृष्णामाईमध्ये शेकडो दीपदान करण्यात आले, याप्रसंगी लहान थोर महिला पुरुष उपस्थित होते.
