चिखलीच्या वरद डुबे याची नवोदय विद्यालयासाठी निवड
महाबळेश्वर :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली, तालुका महाबळेश्वरचा विद्यार्थी वरद विजय डुबे याची नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतून सातारा येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. वरदने सातारा सैनिक स्कुल प्रवेश परीक्षेतही यश मिळवले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक विष्णू ढेबे, उपशिक्षक महेश पवार, वैशाली दाभाडे, अमोल कुंभार आणि पालक विजय आणि मनिषा डुबे यांच्या मार्गदर्शनामुळे वरदला यश मिळालं आहे. वरदने वर्षभर अविरत मेहनत आणि सराव तसेच शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाल्याचं म्हटलं आहे.
वरदच्या यशासाठी गटविकास अधिकारी अरुण मरभळ, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिल पार्टे, मधूसागरचे उपाध्यक्ष संपतभाऊ जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख संतोषआप्पा जाधव, सरपंच दिपाली पवार, उपसरपंच नदीमभाई शारवान, ग्रामसेवक लोखंडे आण्णा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिबा चव्हाण, उपाध्यक्षा संगिता जाधव, कोंडीबादादा जाधव, सर्व सदस्य, विविध मान्यवर तसेच सर्व ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ चिखली यांनी अभिनंदन केले आहे.