Home » ठळक बातम्या » छत्रपती शिवाजी महाराज जागतिक किर्तीचे सर्वोत्तम राजे

छत्रपती शिवाजी महाराज जागतिक किर्तीचे सर्वोत्तम राजे

छत्रपती शिवाजी महाराज जागतिक किर्तीचे सर्वोत्तम राजे 

इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांचे मत , सातारा येथे शिवजन्मोत्सव सोहळा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अथांग आहे. महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या रयतेला एकत्र करून त्यांना स्वराज्याचा अर्थ समजावणारे छत्रपती एकमेव होऊन गेले. काटेकोर नियोजन आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर जगातील निष्णात सेनानींचा त्यांनी पराभव केला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातील जागतिक दर्जाचे सर्वोत्तम राजे म्हणावे लागतील असे ठाम मत इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केले.

सातारा येथील यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात ‘ छत्रपती शिवरायांचे कार्य आणि व्यवस्थापन ‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, सल्लागार संजय मोरे , संजय कदम , संचालक डॉ. विवेक रेदासणी , प्राचार्य डॉ. प्रवीण बडदापुरे , सहसंचालक प्रा. रणधीरसिंह मोहिते , प्राचार्य सुहास तळेकर , प्राचार्य विठ्ठल चौरे , प्रा. प्रवीण गावडे यांसह प्रमुख उपस्थित होते.

इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे म्हणाले , ‘ मुघलांच्या आक्रमणाने, परकीय राजवटीने गांजलेल्या मराठी जनतेला पुन्हा उभं करण्याचं, त्यांना स्वराज्य मिळवून देण्याचं कार्य छत्रपतींनी केलं. अवघ्या ३५ वर्षाच्या कारकिर्दीत ७५० वर्षाची गुलामगिरी नष्ट करून स्वतंत्र राज्य उभा केलं. उत्तम प्रशासन, युद्धकौशल्य, रणनीतीमधला दूरदृष्टीपणा, रयतेबद्दलचा जिव्हाळा, अफाट शौर्य, उत्कृष्ट नेतृत्व असे सगळे गुण एकत्र असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल शासक होते. तत्कालीन काळात वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी सुरु केली , स्वराज्यातील जमीनीची तीन वेळा मोजणी केली , ती ओलिताखाली आणण्यासाठी धरणे बांधली. राज्य राखीव फौज , फॅमिली पेन्शन योजना , बालदरवेशीगृह , आडशेरी योजना , स्वच्छ अभियान यासारख्या लोककल्याणकारी योजना राबवून दूरदृष्टीने स्वराज्य निर्माण केले. नियोजनबद्ध कारभार हे स्वराज्याचे मुख्य सूत्र होते. आधुनिक युगातही सामाजिक विकासासाठी छत्रपती शिवरायांचे विचार प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी यशोदा इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ढोलताशासह भव्य मिरवणूक काढली होती. तसेच शिवकालीन शस्त्र चालविण्याचे व मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket