Home » देश » छगन भुजबळ दोषमुक्त….

छगन भुजबळ दोषमुक्त….

छगन भुजबळ दोषमुक्त….

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दोषमुक्त केले आहे. आधी एसीबी आणि आता ईडी अशा दोन्ही यंत्रणांकडून भुजबळ आता दोषमुक्त ठरविण्यात आले आहे.दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात सुमारे ८५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर होता. यामध्ये त्यांना अटक होऊन दोन वर्षे तुरुंगातही राहावे लागले होते. 

पूर्वी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांना दोषमुक्त ठरविले होते. त्यानंतर मुख्य गुन्हाच सिद्ध न झाल्याने ईडीनेही त्यांना दोषमुक्त ठरविले होते. पुढे या खटला न्यायालयात नेण्यात आला. या अर्जावर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने ईडीचा खटला रद्दबातल ठरवत भुजबळांसह १४ जणांना दोषमुक्त केले. त्यांच्या दोषमुक्तीवर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket