Home » देश » देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांने सन्मानित

देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांने सन्मानित

देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांने सन्मानित

इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया ही एक नामांकित कंपनी असून त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा व व्यक्तींचा पुरस्कार देवून गौरव केला जातो. या संस्थेच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. खा. श्री. नितीन पाटील यांना इंडियन बँकिंग असोसिएशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोपाल भगत यांचे शुभ हस्ते “सर्वोत्कृष्ट चेअरमन” आणि डॉ. राजेंद्र सरकाळे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी पोलीस जॉईंट कमिशनर मा. श्री. संजय शिंदे यांचे शुभ हस्ते “सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी” या पुरस्काराने सन्मानित करणेत आले. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन रिझर्व्ह बँकेचे आणि नाबार्डचे संचालक मा. श्री. सतीश मराठे यांचे हस्ते झाले. यावेळी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना आणि बँकींग रेग्युलेशन अॅक्टचे परिणाम, अंमलबजावणी अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन केले.    

 सातारा जिल्हा बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँक, नाबार्ड यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार व बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट व महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार केले जाते. जिल्हयाची वैभवशाली परंपरा कायम टिकविण्याकरीता बँकेचे अध्यक्ष मा. खा. श्री. नितीन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे . कुशल मा .संचालक मंडळ व उत्तम प्रशासन, खर्चात काटकसर, काटकसरीतून बचत, बचतीतून समृध्दी व समृध्दीतून स्वावलंबन हा सहकाराचा मुलमंत्र घेऊन बँक प्रगतीची घोडदौड करीत आहे. याच सर्वंकष कामकाजाबद्दल बँकेचे अध्यक्ष मा. खा. श्री. नितीन पाटील यांना “उत्कृष्ट अध्यक्ष” या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. 

 या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष मा. खा. श्री. नितीन पाटील म्हणाले, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. या पुरस्काराने बँकेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे. 

 डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी तीस पेक्षा जास्त देशांचा बँकिंग व शेतीविषयक अभ्यास दौरा केला असून शेतीविषयक पाच पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित केलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून सर्वसामान्य शेतकऱ्याना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे व कृषीच्या माध्यमातून ग्रामीण जनजीवनात अमुलाग्र बदल घडवून कृषी क्रांती केलेली आहे. तसेच आपल्या विविध पुस्तकातून पारंपारिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड कशी द्यावी, कृषी उत्पादन ते निर्यातीपर्यंत सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली आहे. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेमध्ये विविध उपक्रम राबवून, आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. जिल्ह्यातील शेतकरी सभासदांच्या कल्याणासाठी तसेच जिल्ह्यातील शेतकरी सभासदांचे जीवनमान उंचावणेसाठी बँकेच्या माध्यमातून त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. या सर्वंकष कामकाजाची नोंद घेऊन डॉ. राजेंद्र सरकाळे यांना ‘उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून सन्मानित केले आहे. 

 मा. श्री. गोपाल भगत यांनी बँकेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामकाजाची प्रशंसा केली.  मा. श्री. संजय शिंदे यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून विशेष उल्लेख केला. 

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. जाहिद सिद्धिकी, श्री. प्रेषित देशमुख तसेच ज्युरी श्री. प्रमोद कर्नाड, व श्री. यशवंत पाटील बँकेचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत मांढरे, श्री. संभाजी यादव उपस्थित होते. 

 या पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद पाटील, मा. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, माजी सहकार मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई तसेच सर्व संचालक सदस्य यांनी अभिनंदन करून बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक

Live Cricket