केळघरमध्ये जय दुर्गामाता मंडळाच्यावतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
केळघर प्रतिनिधी –नवरात्रोत्सवानिमित्त जय दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ, केळघर यांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुनील बेलोशे व उपाध्यक्ष संतोष बिरामणे यांनी दिली.
गेल्या २८ वर्षांपासून जय दुर्गामाता मंडळ नवरात्रोत्सवाच्या काळात धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबवत असून, यंदाही अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांचे तपशील –
ग्रुप डान्स व सोलो डान्स स्पर्धा
महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणदर्शन कार्यक्रम (सोमवार)
महाहोम हवन व सत्यनारायण महापूजा तसेच महाप्रसाद (मंगळवार, ता.३०)
रक्तदान शिबिर (बुधवार, १ ऑक्टोबर)
भाविक व ग्रामस्थांनी या धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ, केळघर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
