Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » सीए.धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

सीए.धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

सीए.धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

कराड: दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सीए, धनंजय अशोक शिंगटे यांच्या नियुक्तीसाठी नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांना विविध उद्योगव्यवसायातील लेखापरीक्षणाचा दीर्घ अनुभव असून बँकिंग क्षेत्रात ते सुमारे गेल्या दशकापासून कार्यरत आहेत. बँकेच्या हिशेब विभागाचे महाव्यवस्थापक म्हणून ते गेल्या ६ वर्षांपासून जबाबदारी अतिशय उत्तमपणे पेलत आहेत.

सीए. दिलीप गुरव दि.३१ मे २०२५ रोजी बँकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले असून त्यावेळी सीए. धनंजय शिंगटे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सीए. धनंजय शिंगटे यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव बँकेने पाठविला होता. यानुषंगाने सीए. धनंजय शिंगटे यांचे शिक्षण, अनुभव आणि आवश्यक सर्व निकषांची पूर्तता होत असल्याने सदर प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत रिझर्व्ह बँकेने सीए. धनंजय शिंगटे यांची दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यास दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी मान्यता कळविली आहे.

सीए. धनंजय शिंगटे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी अत्यंत कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. शिवाजी विद्यापीठाअंतर्गत लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, सातारा या महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य विभागातील पदवी घेतली असून त्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकौंटंट ही पदवी संपादन केली. सीए. धनंजय शिंगटे यांना वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनादेखील अशीच कमी वयात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कामकाजाची संधी मिळाली होती.

सीए. धनंजय शिंगटे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक व अर्बनकुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, कराड अर्बन कुटुंब सल्लागार सीए, दिलीप गुरव, संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य तसेच बँकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि सभासद, ग्राहक व समाजातील विविध घटकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 60 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket