महाड येथिल सावित्री नदीत महाबळेश्वरातील तीन दर्शनार्थींचा बुडून मृत्यू
प्रतापगङ:महाबळेश्वर येथील तानु पटेल रस्ता गवळी मोहल्ला परिसरातील नालबंद बंधु आपल्या कुटुंबा समवेत त्यांचा मित्र पटेल याच्यासह महाङ जवळील सव गावातील दर्ग्यात दर्शनासाठी गेले असता या कुटुंबातील एक युवक पोहण्यासाठी सावित्री नदीत उतरला मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुङत असताना त्या युवकाला वाचवण्या साठी इतर दोघे सावित्री नदी पात्रात उतरले परंतु त्यानां पाण्याच्या खोली चा आंदाज नआल्याने तसेच पोहोता येत नसल्याने त्या दोघांनाही जलसमाधी मिळाली.
मृत व्यक्तींची नावे अनुक्रमे दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद तसेच जाहिद जाकीर पटेल अशी आहेत. सर्वजण महाबळेश्वर येथील रहिवासी होते.
घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने सखोल शोध घेऊन तीनही मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.