बोरखळ ग्रामस्थांना दिलेला शब्द अखेर पाळला
(सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाने रस्ता दुरुस्ती केली सुरू)
शिवथर(सुनिल साबळे) बोरखळ तालुका सातारा ते सोनगाव रस्त्यावर एका शेतकऱ्याने रस्ता अडवला होता त्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती.याच रस्त्यावरून वाहन चालकांना व ग्रामस्थांना जाताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत होते गेली कित्येक वर्ष या रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे बोरखळ ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी काही महिन्यापूर्वी रास्ता रोको केला होता. त्यावेळी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभागाने काही दिवसांमध्येच रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येईल असा शब्द दिला होता तोच शब्द पाळून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली गेली आहे.

वडूथ ते माहुलीला जाणारा जोड रस्ता आहे सदरच्या रस्त्यावर बोरखळ गावालगत अर्धा किलोमीटर रस्त्या एका शेतकऱ्याने गेली कित्येक वर्ष अडवला होता त्याच रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून वाहन चालकांचे अपघात होऊन जायबंदी व्हावे लागले होते तसेच ग्रामस्थांना देखील या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत होती परंतु ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महसूल विभागाला कागदोपत्री पूर्तता करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी रास्ता रोको केला होता जोपर्यंत रस्त्याचे काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्र घेतला होता परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग सातारा चे कार्यकारी अभियंता खैरमोडे व तत्कालीन वडूथ मंडल अधिकारी कुलकर्णी यांनी कागदोपत्री तांत्रिक अडचण असल्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्ती करता येत नसल्याचे सांगितले होते परंतु लवकरात लवकर तांत्रिक अडचण दूर करून याच रस्त्याची दुरुस्ती केली जाईल असा शब्द दिला होता.तोच शब्द त्यांनी पाळला असल्याने आणि तातडीने काम चालू केले असल्याने ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे आभार व्यक्त केले तसेच बोरखळ व परिसरातील ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे देखील आभार व्यक्त केले.




