सातारा नगरपरिषदेत भाजपाची निर्विवाद सत्ता अमोल मोहितेंचा पदभार सोहळा उत्साहात संपन्न
सातारा (अली मुजावर )–सातारा नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर सातारा नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. अमोल मोहिते यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
या पदभार स्वीकार सोहळ्यास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन्ही राजेंनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना लोकाभिमुख, पारदर्शक व विकासाभिमुख कारभारासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास विविध मान्यवर, अधिकारी तसेच नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन नेतृत्व सकारात्मक आणि प्रभावी कामकाज करेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.



