कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार
सातारा:जावली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन गट आणि सहा गणांच्या निवडणूकीची धामधूम सध्या जोरात सुरू आहे.तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कुडाळ गटात यावेळी भाजपाच्यावतीने राजकीय अनुभव,जनसंपर्क असणाऱ्या माजी सभापती सौ.जयश्रीताई गिरी यांना उमेदवारी मिळाली आहे.यामुळे गेली दोन पंचवार्षिक या गटावर असलेले विरोधी गटाची ताकद आता कमी झाली असून नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पकड मजबूत झाली आहे.यामुळे पुन्हा एकदा सौ जयश्रीताई गिरी यांच्यारूपाने कुडाळ गटात भाजपचे कमळ फुलणार आहे असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
भाजपच्या गट आणि गणाचे उमेदवारांकडून प्रचाराचा झंझावात सुरू झाला असून मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे.यावेळी कुडाळ गटात दीपक पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पूनम नायकुडे याना उमेदवारी दिली आहे.यामुळे गटात दुहेरी लढत होण्याची दाट शक्यता आहे.
यामध्ये सामाजिक ,सांप्रदायिक कार्याचा संगम साधत राजकीय पटलावर आपले वेगळे वलय निर्माण करणाऱ्या गिरी दांपत्य जनमानसात आपुलकीची आपलेपणाची भावना जपली आहे.सर्वसामान्यांच्या अडीअडचणीमध्ये सहकार्य करणारी अशी ओळख आहे.यामुळे या निवडणुकीत निश्चितच कुडाळ गटात भाजपाच्या उमेदवारांचे पारडे जड आहे.
कुडाळ गटातील दोन पंचवार्षिकची पराभवाची मालिका खंडित करत या निवडणुकीत भाजपाच्या अधिकृत उमेदवार सौ.जयश्रीताई गिरी निश्चितच एकहाती विजयश्री खेचून आणत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उमेदवारी देऊन विश्वास सार्थ करून दाखवू .असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.कुडाळ गटासह तालुक्यात सर्वच जागांवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे कमळ फुलणार आहे असा सर्वसामान्य जनतेतुन सूर उमटत आहे.



