Home » ठळक बातम्या » बांगलादेशमध्ये बीएनपी पक्षाचा मोठा विजय; दोन तृतीयांश बहुमत मिळवून ठरला मोठा पक्ष

बांगलादेशमध्ये बीएनपी पक्षाचा मोठा विजय; दोन तृतीयांश बहुमत मिळवून ठरला मोठा पक्ष

बांगलादेशमध्ये बीएनपी पक्षाचा मोठा विजय; दोन तृतीयांश बहुमत मिळवून ठरला मोठा पक्ष

बांगलादेशमध्ये गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने मोठा विजय मिळवला आहे. BNP ने 299 जागांपैकी 209 जागा जिंकून बहुमतासाठी आवश्यक असलेला 150 चा आकडा पार केला. आतापर्यंत 286 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

 बांगलादेशमध्ये गुरूवारी (१२ फेब्रुवारी) १३व्या संसदीय निवडणुकांसाठी मतदान पार पडले. शुक्रवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली. बांगलादेशमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातमीनुसार बीएनपी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांनी सत्ता स्थापनेच्या दिशेने झेप घेतली आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर नवीन सरकार निवडण्यासाठी बांगलादेशमधील जनतेने गुरुवारी महत्त्वपूर्ण सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केले. गुरूवारी देशभरातील ३०० पैकी २९९ संसदीय मतदारसंघांमध्ये कडक बंदोबस्तात मतदान पार पडले. एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे त्या मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश 

उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश  उंब्रज परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा  उंब्रज –उंब्रज आणि

Live Cricket