वडवाडी, हरताळी, भाटघर येथील विकासकामांचे भूमिपूजन पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते संपन्न
प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे खंडाळा तालुक्यातील वडवाडी, हरताळी व भाटघर या ठिकाणी ग्रामविकास योजनेअंतर्गत
विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. या कामांचे भूमिपूजन जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
या योजनेअंतर्गत मंजूर निधीमधून वडवाडी येथे जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण करणे, हरतळी येथे मंदिर परिसर सुशोभीकरण करणे व भाटघर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणे हि कामे मार्गी लागणार आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे मार्गी लागलेल्या ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. या भूमिपूजनाप्रसंगी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील सर्वत्र विकासाची गंगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वाहत आहे. आजपर्यंत होत नव्हती अशी सर्व कामे आता मार्गी लागत आहेत व इथून पुढेही लागणारच असेही जाधव म्हणाले.
याप्रसंगी वडवाडी, हरतळी, भाटघर या गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
